'बिग बॉस' मराठीत यंदा एकामागोमाग एक धक्के दिले जात आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींची बांधणी करत यंदाचं सीझन हटके करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बिग बॉस मराठीच्या सिझन चौथामध्ये तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, अमृता धोंगडे, निखिल राजशिर्के, किरण माने, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, अपूर्वा नेमळेकर, योगेश जाधव, यशश्री मसुरकर, अमृता देशमुख, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, रोहित शिंदे यांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे. आजपासून १०० दिवस १६ सदस्य कॅमेराच्या काय तर महाराष्ट्राच्या नजरकैदेत असणार असं म्हणायला हरकत नाही.
घरात प्रवेश होताच एकमेकांबद्दल कुरघोड्या आणि टीका सुरु झाल्या. आता खरंच सगळं "ALL IS WELL" असेल का हे लवकरच कळणार आहे. बिग बॉसचे यावर्षीचे अप्रतिम घर सदस्यांना देखील आवडले, घराच्या ते प्रेमातच पडले हे नक्की ! प्रत्येक सदस्याला घरात प्रवेश करण्याआधीच त्यांची कामे बिग बॉसने ठरवून दिली. नुकताच एक प्रोमो समोर आला असून सदस्यांमध्ये चांगलाच वाद झाल्याचे दिसून येत आहे, याचसोबत मतभेद देखील झाले.
बिग बॉस यांनी जाहीर केले, प्रत्येक गटातील चारही सदस्यांनी हे ठरवायचे आहे कि, या चार गटांतील सदस्यांनी मिळून आपल्यापैकी एका सदस्याचं नाव सर्वात निरुपयोगी सदस्य म्हणून द्यावं असा टास्क देण्यात आला. यावेळी त्रिशूल मराठे आणि किरण माने यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. “मला वाटतं किरण सर, कारण बाकी आम्ही सर्व तरुण आहोत.” त्यावर लगेचच किरण माने त्याला, “अरे मग मी काय म्हातारा आहे काय?” असं उत्तर देताना दिसत आहेत. तर अपूर्वाने प्रसादचे नावं घेतले, ती असं देखील म्हणाली "मी इथे कोणाची मनं जपायला आली नाहीये". आता बघूया सदस्य कोणत्या खेळाडूला ठरवणार निरुपयोगी ? तेव्हा बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही VOOT वर.