बिग बॉस मराठी(Bigg Boss Marathi 4)चा १०० दिवसांचा प्रवास आज संपला... १९ सदस्य आणि एक ट्रॉफी ! बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आलेला प्रत्येक सदस्य जिंकण्याचे ध्येय घेऊन घरात आला. पण आपल्याला माहिती होते महविजेता एकच असणार आहे. प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकायला पहिल्या भागापासून सुरुवात केली. सदस्य १०० दिवसं अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठी सिझन चौथाचा महाअंतिम सोहळा नुकताच मुंबई येथे पार पाडला. महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता मिळाला. अक्षय केळकर बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा विजेता तर अपूर्वा नेमळेकर(Apurva Nemlekar)ने पटकावले दुसरे स्थान. महाअंतिम सोहळा पार पडल्यानंतर अपूर्वाने चाहते आणि प्रेक्षकांचे सोशल मीडियावर आभार मानले आहेत.
स्पष्टोक्तेपणा, बेधडक आणि नेहमीच ठाम मताच्या जोरावर अपुर्वा नेमळेकरने बिग बॉस मराठी४च्या टॉप २ पर्यंत पोहचली. ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची उपविजेती ठरली. तिला या प्रवासात मिळालेल्या चाहत्यांच्या प्रेमासाठी आभार मानले आहेत. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले की, प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार ! हा प्रवास तुमच्या शिवाय अपूर्ण आहे.
अपूर्वा नेमळेकर रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेशिवाय अपूर्वाने आभास हा, तू माझा सांगाती, प्रेम हे यांसारख्या मालिकेत तर एकापेक्षा एक जोडीचा मामला या रिअॅलिटी शो मध्ये देखील काम केले आहे. तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही रात्रीस खेळ चाले २ या मालिकेमुळेच मिळाली. तिने मालिकेत काम करण्यासोबतच चोरीचा मामला, आलाय मोठा शहाणा यांसारख्या नाटकांत काम केले आहे. तसेच इश्क वा लव्ह या चित्रपटातही ती झळकलीय.