Join us  

छोट्या पुढारीने वर्षा उसगावकरांना ढकललं; अंकिताने घनश्यामला थेट पायालाच धरून ओढलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 12:57 PM

Bigg Boss Marathi Season 5 : व्हिडिओत गुहेत जाऊन सदस्य नाणी जमवताना दिसत आहेत. छोटा पुढारीने वर्षा उसगावकर यांची नाणी पाडल्यानंतर अंकिता त्याच्या पायाला धरून खेचताना दिसत आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू होऊन एक महिना झाला आहे. महिन्याभरानंतर बिग बॉसच्या घरातील मैत्रीची समीकरणं पुन्हा बदललेली पाहायला मिळत आहे. टीम A मधील सदस्यांमध्ये फूट पडली आहे. तर टीम B मधील सदस्य अभिजीतमुळे नाराज आहेत. अशातच घरात एक नवीन टास्क पार पडणार आहे. यामध्ये सदस्यांना सोन्याची नाणी शोधायला पाताळलोकात जावं लागणार आहे. 

बिग बॉसच्या घरातील टास्कदरम्यानचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. या टास्कमध्ये सदस्यांना सोन्याची नाणी शोधून जमा करायची आहेत. त्याबरोबरच ती नाणी जपायचीदेखील आहेत. या प्रोमोमध्ये टीम A आणि टीम B मधील सदस्य पाताळलोकात सोन्याची नाणी शोधताना दिसत आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी दोन्ही टीमच्या सदस्यांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. व्हिडिओत गुहेत जाऊन सदस्य नाणी जमवताना दिसत आहेत. छोटा पुढारीने वर्षा उसगावकर यांची नाणी पाडल्यानंतर अंकिता त्याच्या पायाला धरून खेचताना दिसत आहे. हे पाहून घरातील सदस्यांनाही हसू अनावर झाल्याचं दिसत आहे. सदस्यांचा हा टास्क पाहताना प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

आता या सगळ्यात कोण कोणावर भारी पडणार हे जाणून घेण्यासाठी 'बिग बॉस'प्रेमी उत्सुक आहेत. सदस्य एकमेकांचा पाय खेचत आहेत. पण, दुसऱ्याचा पाय खेचून कोण जिंकणार हे पाहणं रंजनकारक असणार आहे. 

दरम्यान, अरबाजने भांडणात घरात तोडफोड केली, त्यामुळे बिग बॉसने त्याला शिक्षा सुनावली आहे. आता अरबाजला या आठवड्याच्या कॅप्टन्सी कार्यात सहभाग घेता येणार नाहीये. यंदाच्या आठवड्यात झालेल्या नॉमिनेशन प्रक्रियेत घरातील अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत हे सदस्य नॉमिनेट झाले होते. परंतु, या आठवड्यात वोटींग लाइन्स बंद असल्याने कोणीही घराबाहेर जाणार नाही. 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारअंकिता प्रभू वालावलकर