Join us

ही चांगली गोष्ट नाही! ७० दिवसांतच 'बिग बॉस मराठी' संपणार असल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्ट मत, म्हणाली- "चांगला टीआरपी असूनही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 4:39 PM

१०० दिवस चालणारा हा शो आता ७० दिवसांतच संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे चाहतेही नाराज आहेत. मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची एक्स स्पर्धक राहिलेल्या सोनाली पाटीलनेही व्हिडिओतून नाराजी व्यक्त केली आहे. 

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा हा नवा सीझन पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. होस्ट बदलण्यापासून ते स्पर्धकांपर्यंत अनेक सरप्रायजेस प्रेक्षकांना या सीझनमध्ये पाहायला मिळाले. रितेश देशमुखच्या भाऊच्या धक्क्याने तर टीआरपीचा रेकॉर्ड ब्रेक केला. त्याचं सूत्रसंचालनही प्रेक्षकांना आवडलं. पण, १०० दिवस चालणारा हा शो आता ७० दिवसांतच संपणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे चाहतेही नाराज आहेत. मराठी अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची एक्स स्पर्धक राहिलेल्या सोनाली पाटीलनेही व्हिडिओतून नाराजी व्यक्त केली आहे. 

सोनाली पाटील काय म्हणाली? 

"पहिल्यापासूनच मला वाटत होतं की यावेळेचा बिग बॉसचा सीझन गाजला पाहिजे आणि हा सीझन गाजलादेखील...आता सगळीकडे बिग बॉस होण्याच्या चर्चा सुरू आहेत. बिग बॉस लवकर बंद होणारे, असं बोललं जातंय. पण, एवढ्या लवकर का बंद करत आहेत? एवढा चांगला टीआरपी असताना...बंद करण्यामागचं कारण काय? आर्या किंवा शोच्या बाबतीत काही गोष्टी झाल्या असतील. पण, जेव्हा सगळ्यांच्या घरातले स्क्रीनवर दिसले आणि बोलले. तेव्हा मला असं अपेक्षित होतं की कुणीतरी घरात जाईल. घरातल्या व्यक्तीला बिग बॉसच्या घरात बघणं हा वेगळा अनुभव असतो. पण, सगळ्यांना स्क्रीनवरच दाखवलं. आणि बिग बॉस एवढ्या लवकर बंद होतंय, ही चांगली गोष्ट नाहीये. मला तर हे आवडलेलं नाही. काय चाललंय?"

दरम्यान, या आठवड्यात सूरज, निक्की, अरबाज, वर्षाताई आणि जान्हवी हे सदस्य नॉमिनेट आहेत. नॉमिनेशनमध्येही मोठा ट्विस्ट आला आहे. अरबाज आणि निक्की डेंजर झोनमध्ये असून वर्षाताई, जान्हवी आणि सूरज सेफ झाले आहेत. त्यामुळे अरबाज किंवा निक्की यापैकी एकाचा घरातील प्रवास संपणार आहे.  

टॅग्स :बिग बॉस मराठीरितेश देशमुखटिव्ही कलाकार