बिग बॉस मराठीच्या (bigg boss marathi) माध्यमातून लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अमृता देशमुख (amruta deshmukh) आणि प्रसाद जवादे (prasad jawade). काही दिवसांपूर्वीच या जोडीने त्यांच्या लग्नगाठ बांधली. त्यामुळे सध्या ते चर्चेत येत आहे. बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर ही जोडी एकमेकांना डेट करु लागली आणि काही काळातच त्यांनी एकमेकांशी लग्न सुद्धा केलं. अलिकडेच अमृता-प्रसादने 'लोकमत फिल्मी'च्या 'लव्ह गेम लोचा' या शोमध्ये हजेरी लावली होती. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद-अमृताने त्यांची लव्हस्टोरी, रिलेशनशिप यावर भाष्य केलं. याबरोबरच अनेक गोष्टींचा खुलासाही या मुलाखतीत त्यांनी केला.
अमृता-प्रसादने दिलेल्या मुलाखतीमध्ये अमृताने प्रसादच्या स्वभावाचे अनेक पैलू उलगडले. यामध्येच बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर प्रसादची पर्सनालिटी एकदम वेगळी होती, असं अमृताने सांगितलं.
"घरी आल्यावर मी जे पाहिलं तेव्हा माझं असं झालं होतं की, ते काय होतं प्रसाद. बिग बॉसमध्ये तो असा होता की जणू काय मीच त्याला मानसिक त्रास देतीये. अशा पद्धतीत तो शांत असायचा. आणि, नंतर तो खूप खुलला. मग माझं असं झालं की त्यावेळी (बिग बॉसमध्ये) तू असा का नव्हतास. जर असतास तर आपल्याला एकमेकांविषयी जे वाटतं ते जास्त जाणवलं असतं. पण, त्याच्या मल्टिपल काही गोष्टींमुळे तो थोडा मागे झाला होता. त्यामुळे माझं असं झालं होतं की याला काय अर्थ आहे. आणि, मग मी चिडले होते," असं अमृता म्हणाली.
दरम्यान, अमृता आणि प्रसाद 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. 'बिग बॉस'च्या घरातच त्यांची पहिली भेट झाली. सुरुवातीला अमृता-प्रसादची चांगली मैत्री झाली होती. त्यानंतर हळूहळू ते एकमेकांच्या प्रेमात पडले. आणि, त्यांनी लग्नगाठ बांधली.