Join us

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्रीचा बिकिनी लूक! नवऱ्यासोबत बालीमध्ये साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 13:06 IST

नवरा बायको आठवडाभरापासून बालीमध्ये आहेत. ३ मार्चला त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला तर काल अभिनेत्रीचा वाढदिवसही तिथेच सेलिब्रेट केला.

बिग बॉस मराठीचं पर्व अनेक गोष्टींमुळे गाजलं. अभिनेता रितेश देशमुखने पहिल्यांदाच बिग बॉसचं सूत्रसंचालन केलं. निक्की तांबोळी, वर्षा उसगांवकर यांची भांडणं गाजली. आर्या जाधवचं थप्पड प्रकरण, डीपीची कॉमेडी, अंकिताचं रडणं अशा अनेक गोष्टींमुळे हे पर्व चर्चेत होतं. या पर्वातून सर्वात लवकर बाहेर पडलेल्या सदस्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री योगिता चव्हाण (Y0gita Chavan). योगिताने नुकताच बाली येथे तिचा वाढदिवस साजरा केला. तिचा बिकिनी लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री योगिता चव्हाण नवरा सौरभ चौघुलेसोबत बालीला जाऊन गेली आहे. तिथे तिने पहिल्यांदाच स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घेतला. याचे व्हिडिओ तिने पोस्ट केले होते. काल योगिताने तिचा वाढदिवस साजरा केला. पांढऱ्या बिकिनीमधील फोटोंचं कोलाज तिने पोस्ट केलं आहे. यात ती एकदम हॉट लूकमध्ये दिसत आहे. बीचवरील हे सुंदर फोटो तिने शेअर केले आहेत. तसंच पाण्यात डाईव्ह मारुन तिने मनसोक्त पोहण्याचाही आनंद घेतला. याचीही झलक तिने व्हिडिओ शेअर करत दाखवली आहे. योगिता तिच्या या ट्रीपवर एकदम खूश दिसतेय. "सू्र्यास्त, गुलाबी बीच आणि हॅपी बर्थडे गर्ल!" असं कॅप्शन तिने दिलं आहे. 

योगिताच्या फोटोंवर अनेकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. 'सुंदर फोटो' म्हणत नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. योगिता आणि सौरभ आठवडाभरापासून बालीमध्ये आहेत. ३ मार्चला त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता. आणि काल ९ मार्चला योगिता वाढदिवस. हे दोन्ही दिवस त्यांनी बालीमध्येच साजरे केले. या रोमँटिक जोडीवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमराठी अभिनेताटिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्इंडोनेशिया