Join us

मराठी अभिनेत्याला लागली लॉटरी; 'शेरशहा'सोबत शेअर करणार स्क्रीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 16:32 IST

Adish vaidya: ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सीरिजमध्ये हा अभिनेता सिद्धार्थसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

गेल्या काही काळात कलाविश्वाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. त्यामुळेच अनेक बॉलिवूड कलाकार मराठी सिनेसृष्टीत काम करु लागलेत. तर, मराठी कलाकारांचाही हिंदी सिनेसृष्टीत काम करण्याचा ओघ वाढला आहे. यामध्येच आता बिग बॉस मराठी फेम एका अभिनेत्याला चांगलीच लॉटरी लागली आहे. हा अभिनेता पहिल्यांदाच बॉलिवूडच्या शेरशहासोबत म्हणजेच सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करणार आहे. 

'बिग बॉस मराठी'च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे आदिश वैद्य. मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये झळकलेला आदिश लवकरच एका वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिका साकारणार आहे.

‘इंडियन पोलीस फोर्स’ या सीरिजची प्रेक्षक आतुरतेने वाटत पाहत आहेत. ही सीरिज पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. रोहित शेट्टी आणि सुशवंत प्रकाश दिग्दर्शित या सीरिजमध्ये आदिशची वर्णी लागली आहे. आदिशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली.

आदिशने इन्स्टाग्रामवर सिद्धार्थसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत बॉलिवूडच्या या स्टारबॉयसोबत काम करायची संधी मिळाली त्यामुळे फार आनंदात आहे. एका महत्त्वाच्या सीननंतर आम्ही हा फोटो काढला, असं कॅप्शन देत त्याने हा फोटो शेअर केला.

टॅग्स :वेबसीरिजमराठी अभिनेतासिद्धार्थ मल्होत्रारोहित शेट्टी