Join us

"हा वडिलांचे पैसे उडवतो" प्रसिद्ध अभिनेत्याला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळाली वाईट वागणूक, म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 20:17 IST

एका मुलाखतीत त्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळालेल्या वाईट वागणूकीबाबत भाष्य केलं आहे.

प्रत्येक कलाकारला कलाक्षेत्रात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागतं. काही कलाकार आपलं स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होतात तर काहींचं स्वप्न अपूर्णच राहतं. मात्र बिग बॉस फेम पुष्कर जोग हा त्या कलाकरांपैकी एक आहे ज्याने या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही. मात्र या दरम्यान त्याला अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्याव लागलं.   

‘बिग बॉस मराठी’मध्ये पुष्कर सहभागी झाला होता. या शोमुळे त्याला अधिक लोकप्रियता मिळाली. त्याने काही मराठी चित्रपटांमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. तसेच मराठी चित्रपटसृष्टीमध्ये त्याला अनेक कठीण प्रसंगांचाही सामना करावा लागला.

पुष्कर जोगने नुकतंच अभिनेत्री सुरेखा तळवळकर यांच्या ‘दिल के करीब’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने अनेक गोष्टींबाबत भाष्य केले. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मिळालेल्या वाईट वागणूकीबाबत पुष्करने खुलासा केला. तो म्हणाला, “‘बिग बॉस मराठी’ या शोमुळे मला लोक ओळखायला लागले. या शोपूर्वीही मला लोक ओळखत होते. पण त्यावेळी माझ्याबाबत बरंच काही बोललं जायचं. हा फक्त या क्षेत्रात  दोन ते तीन वर्षच टिकू शकतो. हे सगळं माझ्या तोंडावर लोक बोलत होते. कारण आपल्या क्षेत्रात एखाद्याचा अशाप्रकारेच अपमान केला जातो”.

“ गेल्या वर्षभरात माझे चार चित्रपट प्रदर्शित झाले. चारही चित्रपट ओटीटीवर आले. तरीही लोक माझ्यावर जळतात  आणि मला टोमणे मारतात. पण आधी असं नव्हतं. मला खोचकपणे बोललं जायचं. याच्या वडिलांजवळ खूप पैसे होते आणि तेच पैसे हा आता उडवतो आहे असंही लोकांनी मला म्हटलं आहे. पण प्रत्यक्षात मी तसा नाही आहे. खऱ्या आयुष्यात मला माझ्या वडिलांनी नेहमीच जमिनीवर पाय ठेऊनच राहायला शिकवलं.”. असे पुष्कर म्हणाला.  

टॅग्स :पुष्कर जोग