Join us

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेता झळकणार ऐतिहासिक सिनेमात, फोटो शेअर करत म्हणाला, "नशीबवान..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 17:32 IST

'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची ऐतिहासिक चित्रपटात वर्णी लागली आहे.

सध्या सिनेसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांची लाट आली आहे. गेल्या काही महिन्यांत एकामागोमाग एक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. तर अनेक सिनेमांच्या घोषणाही झाल्या आहेत.अशाच एका सिनेमात 'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याची वर्णी लागली आहे. मराठमोळा अभिनेता विशाल निकम ऐतिहासिक सिनेमात झळकणार आहे. विशालने त्याच्या सोशल मीडियावर सिनेमातील लूकचा पहिला फोटो शेअर केला आहे.

विशालने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सेटवरील फोटो शेअर केला आहे. यामध्ये तो ऐतिहासिक लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टला त्याने "श्वासात राजं...ध्यासात राजं..." असं कॅप्शन दिलं आहे. या पोस्टमध्ये त्याने नशीबवान असा हॅशटॅगही वापरला आहे. कोणत्या चित्रपटातील हा लूक आहे? आणि कोणत्या ऐतिहासिक चित्रपटातून विशाल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे? हे त्याने अद्याप गुलदस्त्यात ठेवलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेत मुख्य भूमिका साकारून विशाल घराघरात पोहोचला. त्यानंतर 'बिग बॉस मराठी ३'मध्ये तो सहभागी झाला होता. या पर्वाचा विशाल विनरही ठरला होता. विशाल सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :विशाल निकमबिग बॉस मराठीटिव्ही कलाकारमराठी चित्रपट