Join us

Bigg Boss Marathi 3, Episodes, 7Dec: 'माझे दोन चेहरे आहेत, पण... '; पश्चाताप झाल्यामुळे जय करतोय स्नेहाची मनधरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 15:05 IST

Bigg boss marathi: 'आतापर्यंत तुम्ही स्नेहाचं स्नेह पाहिलं आता वाघ काय असतो ते पाहा', असं म्हणत तिने घरातील प्रत्येकाचे कान पिळले. यामध्येच जय दुधाणेवर तिने चांगलाच टीकेचा भडीमार केला.

वादग्रस्त कार्यक्रम कोणता? असा प्रश्न विचारला तर सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतो तो शो म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). सध्या या शोचं तिसरं पर्व सुरु असून आता हळूहळू हा कार्यक्रम ग्रँड फिनालेकडे वाटचाल करत आहे. या घरात आता केवळ ८ स्पर्धक राहिले असून आता त्यांच्यातील मैत्रीची जागा स्पर्धकांनी घेतली आहे. या घरातील प्रत्येकालाच जिंकायचं आहे. त्यामुळे सगळेच जण आपली मैत्री विसरुन थेट प्रतिस्पर्धी म्हणून खेळू लागले आहेत. यामध्येच घरात सोमवारी झालेल्या भागात स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्य या स्पर्धकांनी पुन्हा एन्ट्री घेतली. मात्र, यांच्या एन्ट्रीमुळे घरातील अनेक गोष्टी झपकन बदलून गेल्या.स्नेहा वाघने घरात प्रवेश केल्यानंतर तिने अनेकांना खडेबोल सुनावले आहेत. 'आतापर्यंत तुम्ही स्नेहाचं स्नेह पाहिलं आता वाघ काय असतो ते पाहा', असं म्हणत तिने घरातील प्रत्येकाचे कान पिळले. यामध्येच जय दुधाणेवर तिने चांगलाच टीकेचा भडीमार केला. इतकंच नाही तर त्याच्या गळ्यात Looser चं लॉकेटही घातलं. या प्रकारानंतर जय, स्नेहाची माफी मागतो. मात्र, स्नेहा त्याला माफ करणार नसल्याचं दिसून येत आहे. 

स्नेहाने घरात प्रवेश केल्यावर जयवर अनेक आरोप केले. सोबतच 'तुम्ही या सगळ्यात एक मैत्रीण गमावून बसलात', असंही ती म्हणाली. तिच्या या वाक्यामुळे जय प्रचंड दुखावला आहे. "मी मुळात असं काहीच बोललो नाही आणि जे काही बोललो किंवा ज्या गोष्टी केल्या ते मला करावं लागलं, माझे दोन चेहरे आहेत. पण, तुमच्यासमोर खरा चेहरा होता", असं जय, स्नेहाला समजावून सांगतो. परंतु, स्नेहा मात्र तिच्या मतावर ठाम आहे. 

आजच्या भागात जय पुन्हा एकदा स्नेहाची माफी मागतांना दिसणार आहे. तिच्यासमोर विनवणी करताना दिसणार आहे. त्याचा हा प्रयत्न काही संपता संपेना असं चित्रा कुठेतरी आपल्याला बघायला मिळणार आहे. जयचे म्हणणे आहे, "एक गोष्ट लक्षात ठेव जे काही केलं ते खरंच मनापासून केलं. माझं काहीच intension नव्हतं तुला हर्ट करायचं, किंवा तुला कमीपणा दाखवायचं, किंवा तुला बाहेर काढण्याचं, खरंच तुला जे वाटतं आहे ना जे काही तू बोलीस... and I am sorry …", असं जय म्हणतो. 

दरम्यान, "जर तुम्हांला वाटतं नाही तुमचं चुकलं आहे तर सॉरी बोलून काय उपयोग आहे?. इतकंच नाही तर, तुम्ही जे काही बोलला आहे ते नॅशनल टेलिव्हीजनवर आहे", असं स्नेहा म्हणते. 

टॅग्स :बिग बॉस मराठीस्रेहा वाघटिव्ही कलाकारटेलिव्हिजनतृप्ती देसाई