Join us

 Bigg boss marathi: नीथाला टीममध्ये घेण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ? कोणाच्या टीममध्ये जाणार ही नवी स्पर्धक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 16:45 IST

Bigg boss marathi: बिग बॉसच्या घरात आतापर्यंत दोन ग्रुप होते हे सगळ्यांनाच ठावूक होतं. परंतु, आता घरात आणखी एक नवा तिसरा ग्रुप होताना दिसत आहे.

बिग बॉस मराठीचं (bigg boss marathi) तिसंर पर्व सुरु होऊन आता एक महिन्याचा कालावधी लोटला आहे. या एका महिन्यात बिग बॉसच्या घरात अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळालं. काही स्पर्धकांनी लवकर निरोप घेतला. तर काही स्पर्धकांची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली. नुकतीच या घरात नीथा शेट्टी-साळवी (Neetha Shetty-salvi) या अभिनेत्रीची वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे. त्यामुळे महिन्याभरापासून या घरात वावरत असलेले स्पर्धक तिच्या वागण्याबोलण्याकडे, तिच्या एकंदरीत स्वभावाकडे कटाक्षाने लक्ष देत आहेत. यामध्येच आता नीथाला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी स्पर्धकांमध्ये चढाओढ लागल्याचं पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या घरात आतापर्यंत दोन ग्रुप होते हे सगळ्यांनाच ठावूक होतं. परंतु, आता घरात आणखी एक नवा तिसरा ग्रुप होताना दिसत आहे. यामध्ये जय, स्नेहा आणि उत्कर्ष हे त्यांचा स्वतंत्र ग्रुप करताना पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपमध्ये ते नीथाला घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

दुसऱ्या ग्रुपमध्ये किती insecurity आहे हे विकास नीथाला सांगतांना दिसणार आहे. तर, दुसरीकडे जय आणि उत्कर्ष  दुसऱ्या ग्रुपमध्ये आपआपसात कशा प्रकारे वाद आहेत हे सांगताना दिसणार आहेत.  समोरच्या टीममध्ये एकी नाही. त्यांच्यात कॅप्टन कोण बनणार यावरुन वाद होतात. विकास किंवा मीनल यापैकी एकाला कॅप्टन करा, यावरुन त्यांच्यात वाद आहेत. पण मीनलने यावेळी स्टँड घ्यायला हवा, असं उत्कर्ष नीथाला सांगतो.

दरम्यान, उत्कर्षचं ऐकून घेतल्यानंतर नीथा त्यांच्यातून बाजूला निघून जाते. मात्र, निथा गेल्यावर उत्कर्ष, जय आणि स्नेहा यांच्यामध्ये नीथाविषयी गॉसिपिंग सुरु होतं. ही आपल्याकडेच येणार असं उत्कर्ष म्हणतो.  

टॅग्स :बिग बॉस मराठीस्रेहा वाघसेलिब्रिटीटेलिव्हिजन