‘बिग बॉस मराठी 3’च्या चावडीवर महेश मांजरेकर कोणाची शाळा घेणार, याची उत्सुकता असतेच. याशिवाय बिग बॉसमधून कोण बाहेर पडेल, (Bigg Boss Marathi Season 3 Elimination )याचीही उत्सुकता असतेच. या आठवड्यात टीम बीचे अनेक सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे या टीममधून कोण बाहेर होणार, याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. या आठवड्यात मीनल, विकास आणि विशाल यांच्या युक्तीमुळे टीम बीचे अर्धे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यात सोनाली पाटील, उत्कर्ष शिंदे, गायत्री दातार, स्नेहा वाघ, दादूस आणि मीरा जगन्नाथ यांचा समावेश आहे. साहजिकच यांच्यापैकी कोण बाद होणार हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.रिपोर्टनुसार, सोनालीच्या पदरात प्रेक्षकांनी भरभरून मतं टाकली आणि ती सेफ झाली. उत्कर्ष आणि मीरा हे दोघेही सेफ झालेत. त्यामुळे स्रेहा, गायत्री व दादूस डेंजर झोनमध्ये आलेत.
‘फिल्मी बिट’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘फिल्मी बिट’ने दिलेल्या वृत्तानुसार, गायत्री दातारला Gayatri Datar) सर्वाधिक कमी मते मिळाल्याने ती बिग बॉस मराठीमधून आऊट होऊ शकते. या आठवड्यातील एका टास्कदरम्यान गायत्रीच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गायत्रीला टास्क खेळण्यास मनाई करण्यात आली होती. बिग बॉसने तसा आदेश गायत्रीला दिला होता.
गायत्री बिग बॉस मराठीमधून बाद झालीच तर प्रेक्षकांसाठी हा मोठा धक्का असणार आहे. कारण आत्तापर्यंत गायत्रीचे प्रत्येक टास्कमध्ये अगदी 100 टक्के योगदान राहिलं आहे. अर्थात अद्याप फायनल रिझल्ट येणं बाकी आहे. मागच्या आठवड्यात दादूर घराबाहेर होणार असा वोटिंग ट्रेंड होता. पण प्रत्यक्षात वाईल्ड कार्ड एन्ट्री असलेली नीथा शेट्टी घराबाहेर पडली होती. त्यामुळे बिग बॉसमध्ये काहीही होऊ शकतं.