Join us

"तुला कोणत्याही ग्रुपची गरज नाही तर...", अभिजीत सावंतला पत्नीचा फुल सपोर्ट, म्हणते- "त्यांना तुझी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 4:18 PM

'बिग बॉस मराठी' फेम गायक अभिजीत सावंतच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते.

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी' फेम गायक अभिजीत सावंतच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. छोट्या पडद्यावरील सिंगिग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल'च्या माध्यमातून तो नावारुपाला आला. सध्या 'बिग बॉस'च्या घरातील त्याची खेळी प्रेक्षकांना प्रचंड आवडते आहे. अशातच अभिजीत सावंतच्या पत्नीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत नवऱ्याचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. शिवाय 'टीम बी' लाही टोला लगावला आहे.

'बिग बॉस मराठी ५' च्या पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्यांमध्ये 'तू तू मैं मैं' पाहायला मिळते आहे. वाद-विवाद, गॉसिपिंग  आणि मज्जामस्ती अशा अनेक कारणांमुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात दोन्ही टीममध्ये मतभेदांमुळे फूट पडत असल्याचं चित्र आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या भाऊच्या धक्क्यानंतर या दोन्ही टीममध्ये धुसफूस पाहायला मिळते आहे. 

काय म्हणाली अभिजीत सावंतची पत्नी ?

आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर स्टोरी शेअर करत अभिजीतच्या पत्नीने लिहलंय, "तुला नाही तर त्या ग्रुपला तुझी गरज आहे, My Strongest Man". असं म्हणत अभिजीतच्या पत्नीने त्याला  फुल सपोर्ट केला आहे. 

पहिल्याच आठवड्यात 'बिग बॉस'च्या घरात दोन टीम पडल्या. 'टीम ए' मध्ये निक्की तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण शिवाय घन श्याम दरवडे हे स्पर्धक आहेत. तर वर्षा उसगावकर, अभिजीत सावंत, अंकिता वालावकर, पंढरीनाथ कांबळे, रिलस्टार सूरज चव्हाण तसेच आर्या जाधव हे स्पर्धक मिळून 'टीम बी' पूर्ण झाली. त्यातच अभिजीत सावंत 'बी टीमच्या स्ट्रॉंग स्पर्धकांपैकी एक आहे. 

दरम्यान, 'बिग बॉसम'ध्ये हा आठवडा सदस्य जोड्यांमध्येच दिसणार आहेत. अशातच घरात मानकाप्याची दहशत असल्याने कोणीही एकटं फिरु नये अशी सक्त ताकीद 'बिग बॉस'ने स्पर्धकांना दिली आहे. यासाठी 'बिग बॉस'ने काही जोड्या ठरवून दिल्या आहेत. या जोड्यांच्या प्रकरणामुळे अभिजीत आणि निक्कीची चांगलीच गट्टी जमल्याचं पाहायला मिळतंय. आता तर त्याला निक्कीची हवा लागल्याचं म्हणत आहेत. त्यामुळे कुठेतरी अभिजीतच्या वागणुकीवर टीम बीमधील सदस्य व्यक्त होताना दिसत आहेत. त्यावर अभिजीतच्या पत्नीने त्यांना सणसणीत उत्तर दिलं आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत सावंतटेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया