Join us

"निक्की खूप चांगली मुलगी..." जान्हवी किल्लेकरने केलं मैत्रीणीचं तोंडभरून कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 11:17 AM

'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या दिवसापासून जान्हवी-निक्कीमध्ये घनिष्ठ मैत्रीसंबंध निर्माण झाले होते.

Jahnavi Killekar : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या पर्वात स्पर्धेव्यतिरिक्त अनेकांच्या मैत्रीचेही सूर जुळले. त्यातील एक उदाहरण म्हणजे निक्की आणि जान्हवीच्या मैत्रीचं. बिग बॉस मराठीच्या पहिल्या दिवसापासून या दोघींमध्ये घनिष्ठ मैत्रीसंबंध निर्माण झाले होते. त्यांच्या खेळीप्रमाणे मैत्रीचीही सगळीकडे चर्चा रंगली. दरम्यान, ज्यावेळी जान्हवीला बिग बॉसच्या घरात जेलमध्ये राहण्याची शिक्षा मिळाली तेव्हा या जिवलग मैत्रीणींमध्ये ताटातूट झाली होती. अशातच आपल्या निक्कीसोबतच्या मैत्रीवर जान्हवीने नुकतंच भाष्य केलं आहे.

'बिग बॉस'मधून बाहेर येताच जान्हवी किल्लेकरने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने निक्कीसोबतच्या मैत्रीच्या नात्यावर भाष्य केल्याचं पाहायला मिळतंय. मुलाखतीत जान्हवी म्हणाली, "मॅच्यूअर होऊन जर विचार केला तर तो एक गेम होता, निक्की याआधीही 'बिग बॉस हिंदी'चा एक सीझन खेळून आलेली मुलगी आहे. निक्कीला मी खूप जवळून ओळखते ती एक चांगली मुलगी आहे. ती शोमध्ये ज्या पद्धतीने वागली आहे तो तिचा गेम असेल. मला त्याबद्दल माहित नाही. पण, निक्की मैत्री निभावण्याच्या बाबतीत कमाल आहे". 

पुढे जान्हवी म्हणते, "तिने माझ्यासाठी खूप काही केलंय. भले 'बिग बॉस'मध्ये आमच्यात वाद झाले, तेव्हा मीडिया इंटरॅक्शन झालेला. तरीही मी तिच्याबद्दल काहीच वाईट बोलले नाही. चुकीची मी होते असं तेव्हा म्हटलं. ती खूप चांगली आहे. केवळ मैत्रीसाठी 'बिग बॉस'मध्ये तिने माझे पाय दाबून दिले .कुठेतरी मैत्री निभावण्याच्या बाबतीत ती चांगली आहे". 

टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकारसोशल मीडिया