Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व सुरू होऊन आता जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. नुकताच या पर्वाचा ९ वा आठवडा सुरू झाला आहे. अगदी कालच रविवारी 'बिग बॉस'च्या घरामध्ये दुसरं एलिमिनेशन पार पडलं. त्यामध्ये अरबाज पटेलला सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे त्याचा या पर्वातील प्रवास इथेच थांबला. दरम्यान, 'बिग बॉस'च्या घरामध्ये अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी हे दोन सदस्य कायमच चर्चेत असायचे. कधी आपल्या खेळीने तर कधी त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे हे दोघं अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. पण, अरबाजची 'बिग बॉस'मधून एक्झिट होताच निक्कीला आता बेचैन वाटत आहे. त्यावर आता गुलीगत धोका फेम सूरज निक्कीला धीर देताना दिसतो आहे.
नुकताच सोशल मीडियावर 'बिग बॉस मराठी'चा एक प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये अरबाज घरातून बाहेर पडल्यामुळे निक्की भावुक झाल्याचं पाहायला मिळते. ऐरवी घरामध्ये कायम ज्या व्यक्तीचा दरारा असतो तिच निक्की आता ढसाढसा रडताना दिसते.
या व्हायरल प्रोमोमध्ये निक्की आणि सूरज घरातील सोफ्यावर बसलेले आहेत. भल्या पहाटे निक्की तांबोळी उदास चेहरा करून बसलेली दिसत आहे. तेव्हा सूरज तिला समजावत आहे. व्हिडीओमध्ये सूरज निक्की म्हणतो, " तुझ्यासोबत कोणी नसेल तरी मी आहे. त्यावर निक्की म्हणते, तू आहेसच. म्हणून मी तुझ्यासोबत बसले आहे. आपली फॅमिली आहे हे घर आपलं आहे".
पुढे निक्की म्हणते, "मी कधीच कोणासमोर घरात राहण्यासाठी हात जोडून भीक मागितली नाही. तेव्हा सूरज तिला धीर देताना म्हणतो, आता रडायचं नाही, स्ट्रॉंग राहायचं. मग सूरजला निक्की म्हणते, मी स्ट्रॉंग आहेच पण जर आपल्या मनात दु: ख राहिल ना, मग ते दु: ख मनात ठेवून पुढे कसं जायचं? त्यावर निक्कीसोबत बोलताना सूरज म्हणतो, आपल्या भावना डोळ्याच्या माध्यमातून बाहेर पडत असतात जेव्हा आपल्या जवळचा माणूस सोडून जातो. आपण एकटे आलोय एकट्याने घरी जायचं आहे त्यामुळे फोकस खेळावर करायचं आहे. मी तुला सांगतोय, मला आता लढायचं आहे. मलाही भावना आहेत पण प्रश्न असा आहे की, आता इथे एकट्याला लढावं लागेल. त्यामुळे स्ट्रॉंग राहायचं. त्यामुळे रडायचं नाही". अशा पद्धतीने सूरज निक्कीला शाब्दिक आधार देत समजावतो.