Join us

सई लोकुरमुळे पुष्कर जोग आणि त्याच्या पत्नीत निर्माण झालाय दुरावा? वाचा काय सांगतोय पुष्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 11:45 AM

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम संपल्यानंतरही सई आणि पुष्कर यांच्यातील मैत्री कायम असून ते दोघे अनेकवेळा एकमेकांसोबत एकत्र दिसतात.

ठळक मुद्देमाझी पत्नी आणि माझी मुलगी यांच्यासोबतचे माझे नाते कसे आहे ह मला कोणालाही सांगायची गरज नाहीये. माझ्या कुटुंबाबाबत उगाचच कोणतीही अफवा पसरवू नका.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. या पर्वाचा टीआरपी देखील खूपच चांगला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात पुष्कर जोग, सई लोकूर, मेधा धाडे, अस्ताद काळे, रेशम टिपणीस, उषा नाडकर्णी यांसारखे कलाकार झळकले होते. या सगळ्यांनाच या कार्यक्रमामुळे प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळाले होते. बिग बॉसच्या घरात असताना पुष्कर आणि सई यांच्या मैत्रीची प्रचंड चर्चा झाली होती. ते दोघे घरात सतत एकत्रच दिसायचे... त्यामुळे बिग बॉसच्या घरात असताना पुष्कर आणि सईची ही मैत्री पाहून या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा जास्त काही आहे का असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. पण आमच्यात केवळ फ्रेंडशिप असल्याचे त्या दोघांनी अनेक मुलाखतीमध्ये कबूल केले होते. 

बिग बॉस मराठी हा कार्यक्रम संपल्यानंतरही सई आणि पुष्कर यांच्यातील मैत्री कायम असून ते दोघे अनेकवेळा एकमेकांसोबत एकत्र दिसतात. पण आता या दोघांच्या मैत्रीमुळे पुष्कर आणि त्याची पत्नी जास्मिन ब्रम्हभट्ट यांच्यात मतभेद निर्माण झाला असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. पुष्कर आणि त्यांच्या पत्नीत दुरावा निर्माण झाल्याचा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. या सगळ्या चर्चांमुळे पुष्कर आता कंटाळला असून त्याने या केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. 

पुष्करचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस होता. पण त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीला पुष्करची पत्नी जास्मिन कुठेच दिसली नव्हती. एवढेच नव्हे तर त्या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावर अनफॉलो केले असल्याचे देखील म्हटले जात होते. पण या सगळ्या बातम्या खोट्या असल्याचे पुष्करने आता टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. तो सांगतो, माझी पत्नी आणि माझी मुलगी यांच्यासोबतचे माझे नाते कसे आहे हे मला कोणालाही सांगायची गरज नाहीये. माझ्या कुटुंबाबाबत उगाचच कोणतीही अफवा पसरवू नका. माझ्या कुटुंबियांना मीडियापासून दूर राहायचे आहे. त्यांना किंवा मला उगाचच कोणत्याही प्रकरणात अडकवू नका.  

टॅग्स :पुष्कर जोगसई लोकूर