Join us

लेट्स गो पार्टी टूनाईट, बिग बॉस मराठी 2 च्या दोन्ही सीझनच्या स्पर्धकांची धम्माल पार्टी…

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 16:28 IST

Bigg Boss Marathi 2 : या निमित्ताने बिग बॉस मराठीच्या दोन्ही सीझनच्या स्पर्धकांची अनोखी मैत्री दिसून आली.

बिग बॉस मराठी या रियालिटी शोने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. पहिल्या सीझनसोबत दुसरा सीझनही रसिकांच्या पसंतीस पात्र ठरला. पहिल्या सीझनच्या स्पर्धकांना रसिकांनी डोक्यावर घेतलं. यानंतर या सीझनमधील स्पर्धकांना विविध ऑफर्स मिळू लागल्या. त्यामुळेच दुसऱ्या सीझनची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.

 

दुसरा सीझन सुरू झाल्यापासून ते अखेरपर्यंत या बिग बॉस मराठी रसिकांना भावला. दुसऱ्या सीझनमध्ये काही भागात पहिल्या सीझनच्या स्पर्धकांनीही हजेरी लावली. पहिल्या सीझनचे सदस्य आणि दुसऱ्या सीझनचे स्पर्धक यांच्यात वेगळं बॉन्डिंग, नातं, प्रेम आणि जिव्हाळा दिसून आला. यावेळी या सगळ्यांनी सीझन संपल्यानंतर पुन्हा एकदा भेटण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार नुकतंच पहिल्या आणि दुसऱ्या सीझनच्या स्पर्धकांनी धम्माल पार्टी केली. 

बिग बॉसच्या पहिल्या सीझनची सदस्य स्मिता गोंदकर हिने या पार्टीचे आयोजन केलं होतं. दुसऱ्या सीझनच्या स्पर्धक किशोरी शहाणे-विज यांनी या पार्टीचे आणि गेट टुगेदरचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या पार्टीला स्मिता गोंदकर, किशोरी शहाणे-विज यांच्यासह रेशम टिपणीस, सुशांत शेलार, आस्ताद काळे, माधव देवचक्के, अभिजीत बिचुकले यांनी हजेरी लावली. यावेळी या सगळ्यांनी धम्माल पार्टी केल्याचे पाहायला मिळतंय. या निमित्ताने बिग बॉस मराठीच्या दोन्ही सीझनच्या स्पर्धकांची अनोखी मैत्री दिसून आली. 

टॅग्स :बिग बॉस मराठीस्मिता गोंदकरकिशोरी शहाणे