बिग बॉस ओटीटी घरामध्ये शमिता शेट्टी व राकेश बापट यांच्यामधील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. त्यांच्या कनेक्शनने नुकतेच त्यांच्या सकाळी 'किस' घेत उठवण्याच्या प्रथेसह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पण मागील एपिसोडमध्ये नॉमिनेशन टास्कच्या वेळी दोघांमध्ये काही गैरसमज निर्माण झाले. परिणामत: राकेश व शमिता त्यांच्या निर्णयांमागील एकमेकांचा दृष्टिकोन समजू शकले नाहीत आणि एकमेकांना सांभाळून घेऊ शकले नाहीत. शेवटी त्यांच्यामध्ये वादविवाद झाला आणि ते त्या स्थितीचे निराकरण करू शकले नाहीत.
तसेच राकेशसोबत खरे कनेक्शन निर्माण करण्याची इच्छा असलेली शमिता तिच्या चिंतांसंबंधित समस्यांचा उल्लेख करणा-या संवादाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करताना दिसण्यात आली. त्यानंतर समस्येचे निराकरण करून स्थिती सुरळीत करण्याच्या विचारासह दोघेही गार्डन क्षेत्रामध्ये बसले आणि त्यांनी समस्येचे निराकरण करण्याचे ठरवले. ते एकमेकांचा हात धरून बसले तेव्हा राकेशने त्याच्या जीवनातील खडतर काळाबाबत सांगितले. तसेच जीवनातील चढ-उतारांबाबत सांगितले, ज्याबाबत त्याने कोणालाच सांगिले नव्हते.