‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या पर्वाचा युट्यूबर एल्विश यादव विजेता ठरला. यानंतर त्याच्या चाहत्या वर्गात भर पडली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’चा विजेता ठरल्यानंतर एल्विश यादव प्रसिद्धीझोतात आला आहे. बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर एल्विशने पहिल्यांदाच त्याच्या चाहत्यांशी इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे संवाद साधला. त्याचं हे इन्स्टा लाइव्ह लाखो चाहते पाहत होते.
एल्विश यादवने इन्स्टाग्राम लाइव्हद्वारे नवा रेकॉर्ड बनवला आहे. त्याने ‘बिग बॉस हिंदी’च्या १६व्या पर्वाचा विजेता ठरलेल्या एमसी स्टॅनचा रेकॉर्ड मोडला आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ जिंकलेल्या एल्विशची क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. त्याने स्टॅनलाही मागे टाकलं आहे. एल्विश यादवने इन्स्टाग्राम लाइव्ह केलं तेव्हा तब्बल ५ लाख ९५ हजार युजर्स ते पाहत होते. आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा आकडा आहे. बिग बॉस जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने इन्स्टा लाइव्ह केलेलं तेव्हा ५ लाख ४१ हजार युजर्स होते.
“हा चित्रपट तुम्हाला रडवेल”, ‘घूमर’ पाहिल्यानंतर सेहवागची पोस्ट, म्हणाला, “अभिषेकचा अभिनय पाहून...”
एल्विशने इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत ही गुडन्यूज चाहत्यांना दिली. तो म्हणाला, “एवढ्या ट्राफिकमुळे माझं लाइव्ह क्रॅश झालं होतं. माझा फोन हँग झाला आणि इन्स्टाग्रामही एवढ्या युजर्समुळे क्रॅश झालं. पण, आपण रेकॉर्ड केला आहे. आपण भारतात एक नंबरवर आहोत.” एल्विश यादव हा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. तो गुरुग्रामजवळील वजीराबाद गावचा रहिवासी आहे. एल्विश एक एनजीओ देखील चालवतो, ज्याबद्दल त्याने बिग बॉसमध्ये सांगितले होते. एल्विसचा सिस्टम क्लोथिंग नावाचा कपड्यांचा ब्रँडदेखील आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर १५.३ मिलियन फॉलोवर्स आहेत.