Join us  

Bigg Boss12 : ‘बिग बॉस 12’जाणार मेघा धाडे? होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 6:29 PM

होय, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी ‘बिग बॉस 12’चे मेकर्स आणखी एक शक्कल लढवू पाहत आहेत.  येत्या आठवड्यात ‘बिग बॉस 12’मध्ये आणखी दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे.

बिग बॉस 12’ अधिकाधिक इंटरेस्टिंग करण्याच्यादृष्टीने मेकर्सनी कुठलीही कसर सोडलेली नाही. अलीकडे शोमध्ये सुरभी राणाची वाईल्ड कार्ड एन्ट्रीही झाली. आता एक अशीच खबर आहे. होय, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी ‘बिग बॉस 12’चे मेकर्स आणखी एक शक्कल लढवू पाहत आहेत.  येत्या आठवड्यात ‘बिग बॉस 12’मध्ये आणखी दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. होय, ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या सीझनची विजेती मेघा धाडे आणि टीव्ही अभिनेता रोहित सुचांती ‘बिग बॉस 12’च्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणार, असे समजते.

बिग बॉस मराठी’चे पहिले सीझन कमालीचे लोकप्रीय झाले होते. ‘बिग बॉस मराठी’मध्ये मेघा धाडेने प्रेक्षकांचे धम्माल मनोरंजन करत, या शोचे विजेतेपद मिळवले होते. याच मेघाला ‘बिग बॉस 12’ने घरात जाण्याची आॅफर दिली असल्याचे कळतेय. याशिवाय रोहित सुचांती यालाही ‘बिग बॉस 12’च्या मेकर्स अ‍ॅप्रोच केले आहे. रोहितने ‘रिश्ता लिखेंगे हम नया’ या मालिकेते रतन सिंहची भूमिका साकारली होती.

मध्यंतरी अभिनेत्री किम शर्मा, टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई आणि टीना दत्ता यांच्याशी वाईल्ड काल्ड एन्ट्रीवर  ‘बिग बॉस 12’च्या घरात जाण्यासाठी संपर्क साधण्यात आल्याची चर्चा होती. पण ताज्या बातमीनुसार, मेघा व रोहित घरात जाण्याची शक्यता अधिक आहे.

टॅग्स :मेघा धाडेबिग बॉस 12बिग बॉस मराठी