Join us

बिपाशा बसूचा फिटनेस फंडा

By admin | Published: April 29, 2017 1:10 AM

बिपाशा बसू ही सध्या सलमान खानसोबत ‘द बँग टूर’ वर आहे. या टूरमध्ये ती चांगलीच व्यस्त आहे; मात्र त्यातही वर्कआऊट करणे चुकवत नाही.

बिपाशा बसू ही सध्या सलमान खानसोबत ‘द बँग टूर’ वर आहे. या टूरमध्ये ती चांगलीच व्यस्त आहे; मात्र त्यातही वर्कआऊट करणे चुकवत नाही. तिने तिच्या सहकाऱ्यांनासुद्धा व्यायामाची सवय लावली आहे. बिपाशाने आपल्या आकर्षक फिगरने इंडस्ट्रीत आणि अनेक चाहत्यांची मने जिंकली आहेत. बिपाशा सध्या आॅस्ट्रेलियात आहे. सिडनीमध्ये ती तिच्या शोची रिहर्सल करतेय. दिवसांतून जवळपास १२ ते १४ तास ती काम करते. यावेळी ती वर्कआऊट करण्याचे विसरत नाही. बिपाशा म्हणते, ‘मी माझे वेळापत्रक पूर्णपणे पाळते. वेळेवर झोपणे, लवकर उठणे हे मी चुकवत नाही. माझा शो असला तरीही. मी कितीही थकलेली असली, तरीही ब्रीदिंग एक्सरसाईझ, स्ट्रेचिंग नियमित करते. मला आधीच गुडघेदुखीचा त्रास आहे. त्यामुळे अजून काही दुखापत होऊ नये म्हणून मी नेहमी माझ्याजवळ आईस पॅक बाळगते.