Join us

बिप्स-करण पुन्हा गोव्यात ‘अलोन’?

By admin | Published: February 28, 2016 3:18 AM

बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे रिलेशनशिपमध्ये असून, ते कधीही त्यांचे नाते मान्य करीत नाहीत. ‘अलोन’ चित्रपटापासूनच त्यांची जवळीक जास्त वाढली आहे.

बिपाशा बासु आणि करणसिंग ग्रोव्हर हे रिलेशनशिपमध्ये असून, ते कधीही त्यांचे नाते मान्य करीत नाहीत. ‘अलोन’ चित्रपटापासूनच त्यांची जवळीक जास्त वाढली आहे. आउटिंग, बर्थडे सेलीब्रेशन करण्यासाठी ते फारच अ‍ॅक्टिव्ह असतात. नुकताच करणसिंग ग्रोव्हर ३५ वर्षांचा झाल्याने त्यांनी त्याच्या वाढदिवसाचे जंगी सेलीब्रेशन केक कापून केले. आता ते दोघे गोव्याला आउटिंगसाठी गेले आहेत. आता आउटिंगला जाण्याचे कारण काय विचाराल तर ‘अलोन’ चित्रपटाचे दोन सिक्वेल येणार असून, त्यात हे दोघे असणार आहेत. या वर्षाच्या शेवटी अलोन चित्रपटाचा दुसरा भाग शूट करण्यास सुरुवात होईल. त्याविषयीची आॅफिशियल घोषणा लवकरच करण्यात येईल, असे कळाले आहे.