‘बँंडिट क्वीन’ या सिनेमात फूलन देवीची भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री सीमा बिस्वास यांचा आज वाढदिवस. 14 जानेवारी, 1965 ला आसमच्या नलबारीमध्ये जन्मलेल्या सीमा यांनी सन 1988 साली ‘अमसिनी’ या चित्रपटातून डेब्यू केला होता. मात्र, त्यांना खरी ओळख मिळाली ती 1994 साली प्रदर्शित झालेल्या शेखर कपूर दिग्दर्शित ‘बँंडिट क्वीन’ या चित्रपटाने. सीमा यांनी फूलन देवीची फक्त भूमिका केली नव्हती तर प्रत्यक्षात ती जगलीही होती.
शूटिंगच्या आधी काही दिवस सीमा यांनी अनेक दिवस काहीच खाल्ले नव्हते. इतर जगाशी नाते तोडत त्या धौलपूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये तासन् तास बसून राहायच्या आणि भूमिकेचा विचार करायच्या. या चित्रपटाने सीमा यांना एक वेगळी ओळख दिली. पण याच चित्रपटातील न्यूड सीन्समुळे त्यांना कधी नव्हे इतकी टीकाही सहन करावी लागली.
‘बँंडिट क्वीन’ चा हा न्यूड सीन शूट केल्यानंतर सीमा रात्रभर रडल्या होत्या. खरे तर हा न्यूड सीन सीमा यांनी स्वत: दिलाच नव्हता. त्यासाठी त्यांनी बॉडी डबलचा वापर केला होता. पण प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा, या सीनमुळे सीमा यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. सीमा यांनी कधीच या टीकेवर प्रतिक्रिया दिली नाही. पण याबद्दल खंत मात्र व्यक्त केली होती.