मुंबई : 90 च्या दशकात आपल्या बोल्ड अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णीचा आज वाढदिवस. 20 एप्रिल 1972 मध्ये जन्मलेल्या ममताने 1992 मध्ये आलेल्या 'तिरंगा' या सिनेमातून आपला बॉलिवूड प्रवास सुरु केला होता.
त्यानंतर ममताने 'मेरा दिल तेरे लिए' या सिनेमात काम केले होते. पण तिला खरी ओळख मिळाती ती 1993 मध्ये आलेल्या 'आशिक आवारा' या सिनेमामुळे मिळाली होती. त्यानंतर बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले.
एकापाठी एक हिट सिनेमे देत असतानाच ममताने एकाएकी बॉलिवूडमधून एक्झिट घेतली. कारण तिच्या आयुष्यात विकी गोस्वामीची एन्ट्री झाली होती. विकीचं खरं नाव विजयगिरी गोस्वामी असं आहे. विकी हा गुजरातमध्ये डीसीपी राहिलेल्या आनंदगिरी गोस्वामी यांचा मुलगा आहे.
असे सांगितले जाते की, शॉर्टकट मार्गाने पैसे कमवण्यासाठी त्याने दारूची आणि ड्रग्सची तस्करी सुरु केली. त्यानंतर विकी मुंबईत आला आणि इथे त्याने ड्रग्सचा बिझनेस सुरु केला. त्यावेळी त्याचे अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत मैत्रिचे संबंध होते.
याचवेळी ममताच्या टॉपलेस फोटोमुळे आणि हिट सिनेमांमुळे ती चर्चेचा विषय होती. तेव्हा तिचं नाव विकीसोबत जोडलं गेलं. त्यानंतर तिचं बॉलिवूड करिअर संपलं. 2002 मध्ये आलेला ममताचा 'कभी तुम, कभी हम' हा सिनेमा शेवटचा ठरला. पण हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच बॉलिवूडमधून गायब झाली.