आशिकी, सडक आणि खिलाडी अशा अनेक सुपरहिट चित्रपटात झळकलेला पण तरीही ‘फ्लॉप अॅक्टर’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता दिपक तिजोरी याचा आज वाढदिवस. 28 ऑगस्ट, 1961 मध्ये जन्मलेला दिपक सध्या बॉलिवूडमध्ये कुठेही नाही. गेल्या काही वर्षांत तो इतका बदलला की, त्याला ओळखणेही कठीण होईल.
कॉलेजच्या दिवसांत दिपक अॅक्टिंगकडे वळला आणि त्याने एक थिएटर ग्रूप ज्वॉईन केला. या ग्रूपमध्ये आमिर खान, आशुतोष गोवारीकर, परेश रावल असे अनेक जण होते. मित्रांनी दिपकच्या अॅक्टिंगचे प्रचंड कौतुक केले आणि दिपकला हिरो बनण्याची स्वप्न पडू लागलीत. बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी दिपक तिजोरीने अनेकांच्या पाय-या झिजवल्या. अखेर ‘तेरा नाम मेरा नाम’ या चित्रपटात त्याला संधी मिळाली. पण सपोर्टींग अॅक्टर म्हणून. यानंतर त्याने पर्वत के उस पार, मैं तेरा दुश्मन, क्रोध अशा अनेक चित्रपटांत छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या. पण तो कधीच हिरो बनू शकला नाही. असे म्हटले जाते की,दिपक तिजोरीने स्वत:च कधीच सहाय्यक अभिनेत्याची भूमिका नाकारून मुख्य भूमिका मागितली नाही. सहाय्यक भूमिका नाकारण्याची हिंमत दाखवली असती तर दिपक तिजोरी आज इंडस्ट्रीचा मोठा हिरो असता.
दिपक तिजोरीची सिनेमांची निवड अगदी योग्य होती. त्याने निवडलेल्या चित्रपटांनी आमिर, शाहरूख, सैफ अली खान, अक्षय कुमार अशा अभिनेत्यांना शिखरावर पोहोचवले. पण दिपक मात्र तिथल्या तिथेच राहिला. 1994 मध्ये ‘मैं खिलाडी तू अनाडी’ हा सिनेमा आला. यात सैफ व अक्षय लीड रोलमध्ये होते. या चित्रपटात दिपक तिजोरीला सैफचा रोल मिळू शकला असता. कदाचित साईड हिरो ही इमेज नसती तर आज दीपक टॉप लीगमध्ये दिसला असता.
अॅक्टिंगमध्ये नशीब आजमावल्यानंतर दिपक तिजोरी दिग्दर्शनाकडे वळला. पण इथेही त्याच्या नशीबाने साथ दिली नाही. 2003 मध्ये दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला चित्रपट आला. पण यातील बोल्ड कंटेंटमुळे तो वादात सापडला. यानंतरचे त्याने दिग्दर्शित केलेले टॉम डिक और हॅरी, खामोशी-खौफ की एक रात हे सिनेमेही कमाल दाखवू शकले नाहीत.
एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमुळे पत्नीने त्याला घराबाहेर काढले. दीपकची पत्नी शिवानी आणि मुलांसोबत गोरेगांवमध्ये फ्लॅटमध्ये राहत होता. याच काळात दीपकचे त्याची योगा ट्रेनरसोबत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर सुरु असल्याचे त्याच्या पत्नीला कळले आणि तिने दीपकला घराबाहेर काढले. यानंतर शिवानीने दीपक विरुध्द कोर्टात डायवोर्स केस फाइल केली होती आणि पोटगी मागितली होती. पत्नीने दिपकला घरात येण्यासही मनाई केली होती. एवढेच नाही तर त्याला खायला प्यायला देण्यात येऊ नये. तसेच त्याची खोलीही स्वच्छ करु नये, असे तिने नोकरांना सांगून ठेवले होते.
या भांडणाच्या काळात दिपकने काउंसलरचा सल्ला घेतला तेव्हा त्याला कळाले की, शिवानीसोबत झालेले त्याचे लग्न कायदेशीररित्या चुकीचे आहे. कारण शिवानीचे हे दुसरे लग्न होते. तिने पहिल्या पतीसोबत घटस्फोट न घेताच दीपकसोबत लग्न केले होते.