Join us

Birthday Special : हिमेश रेशमियामुळे बॉलिवूडच्या या दिग्गज अभिनेत्रीला मिळाला होता पहिला सिनेमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 6:00 AM

बॉलिवूड सिंगर, अ‍ॅक्टर, म्युझिक डायरेक्टर हिमेश रेशमिया याचा आज (23 जुलै) वाढदिवस. 23 जुलै 1973 रोजी गुजरात येथे जन्मलेल्या हिमेशने आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केली.

ठळक मुद्देगतवर्षी ११ मे रोजी हिमेशने सोनिया कपूरसोबत लग्न केले. हे हिमेशचे दुसरे लग्न होते.

बॉलिवूड सिंगर, अ‍ॅक्टर, म्युझिक डायरेक्टर हिमेश रेशमिया याचा आज (23 जुलै) वाढदिवस. 23 जुलै 1973 रोजी गुजरात येथे जन्मलेल्या हिमेशने आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर करिअर म्हणून संगीत क्षेत्राची निवड केली. वयाच्या 16 व्या वर्षी दूरदर्शन अहमदाबादवरून त्याचा हा प्रवास सुरु झाला.  

सलमान खानच्या ‘प्यार किया तो डरना क्या’ या चित्रपटातून त्याची बॉलिवूडमध्ये एन्ट्री झाली. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. यानंतर हिमेशने अनेक चित्रपट व म्युझिक अल्बमला संगीत दिले. पण 2003 मध्ये आलेल्या सलमानच्याच ‘तेरे नाम’ या चित्रपटाने हिमेशला एक नवी ओळख दिली. संगीत दिग्दर्शक म्हणून तो नावारूपास आला.

याच हिमेशमुळे बॉलिवूडला एक दिग्गज अभिनेत्री मिळाली, हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल. होय, ही अभिनेत्री म्हणजे, दीपिका पादुकोण. दीपिकाने हिमेशच्या ‘नाम है तेरा’ या म्युझिक अल्बममध्ये काम केले. यानंतर फराह खानची नजर दीपिकावर पडली आणि फराहने ‘ओम शांती ओम’ या चित्रपटासाठी दीपिकाला साईन केले. पुढे दीपिकाने बॉलिवूडला एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिलेत, हा सगळा प्रवास तर तुम्हाला ठाऊक आहेच.

गतवर्षी ११ मे रोजी हिमेशने सोनिया कपूरसोबत लग्न केले. हे हिमेशचे दुसरे लग्न होते. 2017 मध्ये हिमेशने पहिली पत्नी कोमलपासून घटस्फोट घेतला होता. पहिल्या पत्नीपासून हिमेशला स्वयं नावाचा एक मुलगा आहे. यानंतर त्याने टीव्ही अभिनेत्री सोनिया कपूरसोबत लग्नगाठ बांधली होती. सोनिया व हिमेश १० वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पहिली पत्नी कोमल हिला या नात्याबद्दल कळले आणि तिने हिमेशचे घर सोडले. पुढे तिने व हिमेशने घटस्फोट घेतला.

टॅग्स :हिमेश रेशमियादीपिका पादुकोण