तीन अफेअर, दोन लग्न तरीही एकाकी...! अशी आहे कमल हासन यांची लव्हलाईफ

By रूपाली मुधोळकर | Published: November 7, 2020 07:00 AM2020-11-07T07:00:00+5:302020-11-07T07:00:02+5:30

Happy Birthday Kamal... जाणून घ्या, कमल हासनबद्दल काही गोष्टी...

birthday special kamal haasan love life and unknown facts | तीन अफेअर, दोन लग्न तरीही एकाकी...! अशी आहे कमल हासन यांची लव्हलाईफ

तीन अफेअर, दोन लग्न तरीही एकाकी...! अशी आहे कमल हासन यांची लव्हलाईफ

googlenewsNext
ठळक मुद्देकमल एक क्लासिकल डान्सर आणि सिंगर आहे. त्याचे त्याने खास प्रशिक्षण घेतले आहे. त्याने भरतनाट्यम शिकले आहे.

कमल हासन एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. कमलने ज्या क्षेत्रात हात आजमावला, तिथे त्याच्या हाती यश लाभले. केवळ अभिनयच नाही तर पटकथा लेखन, दिग्दर्शन, निर्मिती, गायन,नृत्य, कोरिओग्राफी अशा सगळ्यात क्षेत्रात कमलने यशाची चव चाखली. पण नात्यांच्या बाबतीत मात्र तो जरा अपयशी राहिला. तीन अफेअर आणि दोन लग्नानंतरही कमल आज एकाकी आहे. कमल हसनचे खासगी आयुष्य विविध अभिनेत्रींशी असलेल्या संबंधांमुळे  वादग्रस्त ठरले. 7 नोव्हेंबर 1954 रोजी एका तामिळ कुटुृंबात कमलचा जन्म झाला. त्याचे बालपणीचे नाव पार्थसारथी आहे.

1970 साली कमल हसन आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात अभिनेत्री श्रीविद्याच्या प्रेमात पडला. दोघांचे अफेअर बराच काळ सुरु होते. मात्र यानंतर दोघांनीही वेगळ होण्याचा निर्णय घेतला. 2006 साली श्रीविद्याने जगाचा निरोप घेतला त्याआधी तिला भेटण्यासाठी कमल आवर्जून पोहचला होता.

श्रीविद्याशी ब्रेकअप झाल्यानंतर 1978 साली 24 वर्षीय कमल हसनचे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या डान्सर वाणी गणपतीशी सूत जुळले आणि दोघांनी लग्न केले. 10 वर्षे संसार केल्यानंतर 1988 मध्ये वाणी व कमल यांचा घटस्फोट झाला.

 

वाणीसोबत घटस्फोट झाल्यानंतर कमलच्या आयुष्यात अभिनेत्री सारिकाची एन्ट्री झाली. यानंतर कमल हसन आणि अभिनेत्री सारिका एकत्र राहू लागले. दोघंही लिव इनमध्ये राहत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. 1988 साली सारिकाने श्रुतीला जन्म दिला आणि त्यानंतर कमल हसनने सारिकाशी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर सारिकाने अभिनयाच्या करिअरला अलविदा केला आणि संसारात रमली.1991 साली तिने अक्षराला जन्म दिला. मात्र 2002 साली कमल आणि सारिका यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. यानंतरही 2 लेकींचा बाप असलेल्या कमल हसनच्या अफेअरच्या चर्चा काही थांबल्या नाहीत.

सारिकाशी घटस्फोट झाल्यानंतर कमल हसन आपल्यापेक्षा वयाने 22 वर्ष लहान असलेल्या अभिनेत्री सिमरन बग्गा हिला डेट करु लागला. मात्र अचानक यानंतर सिमरन हिने आपल्या बालपणीच्या मित्रासह लग्न केले आणि कमलसह असलेले सगळे संबंध तोडले. यानंतर कमल हसनच्या जीवनात आणखी एका अभिनेत्रीचा प्रवेश झाला.

सिमरन आयुष्यातून आऊट झाली म्हणल्यावर कमलच्या जीवनात गौतमी तडीमल्ला आली. दोघंही 2005 ते 2016 या कालावधीत लिव इन रिलेशनशिपमध्ये होते. यानंतर दोघंही सहमतीने वेगळे झाले. याची माहिती खुद्द गौतमीनेच दिली. सध्या श्रुती, अक्षरा आणि गौतमीची मुलगी शुभलक्ष्मी एकत्रच राहतात. 

कमल एक क्लासिकल डान्सर आणि सिंगर आहे. त्याचे त्याने खास प्रशिक्षण घेतले आहे. त्याने भरतनाट्यम शिकले आहे. शिवाय सुप्रसिद्ध गायक बारामुरालीकृष्णा यांच्याकडून गायनाचे धडे घेतले आहेत. कमल अनेक भाषा बोलू शकतो. तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम, कन्नड आणि बंगाली चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे.
वयाच्या १८ व्या वर्षी त्याने त्याची पहिली स्क्रिप्ट ‘उनारचिगल’ लिहिली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या.
 

Web Title: birthday special kamal haasan love life and unknown facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.