‘दबंग’मध्ये भाईजान सलमान खानच्या तोडीस तोड अशी छेदी सिंहची भूमिका साकारुन प्रसिध्द झालेला अभिनेता सोनू सूद याचा आज वाढदिवस. 30 जुलै 1973 ला मोगा(पंजाब) येथे सोनूचा जन्म झाला. सोनू सूदच्या भूमिका लक्षवेधी ठरतात. यामुळे तो कायम लाइमलाईटमध्ये राहतो. पण ख-या आयुष्यात मात्र लाइमलाईटमध्ये राहणे त्याला आवडत नाही. खासगी आयुष्याबद्दल तो फार कमी बोलतो. त्यामुळे तो आणि त्याचे कुटुंब दोन्ही फार क्वचित चर्चेत येतात. सोनूची पत्नी सोनाली कमालीची सुंदर आहे. पण ती सुद्धा कॅमे-यांपासून स्वत:ला दूर ठेवणे पसंत करते. आज सोनूच्या वाढदिवसानिमित्त सोनू व सोनालीची लव्हस्टोरी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
सोनू सूदने 25 सप्टेंबर 1996 मध्ये सोनालीशी लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. खास बात म्हणजे, सोनालीचा फिल्मी इंडस्ट्रीशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. सोनू इंजीनियरिंगचे शिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली होती. पुढे सोनू व सोनाली एकमेकांत इतके गुंतले की, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सोनू पंजाबी आहे तर सोनाली तेलगू आहे. एकदा सोनू सोनालीबद्दल बोलला होता. सोनाली माझ्या आयुष्यात येणारी पहिली आणि अखेरची मुलगी आहे, असे त्याने सांगितले होते.
सोनूच्या स्ट्रगलिंग काळात सोनालीने त्याला मोठी साथ दिली. लग्नानंतर दोघेही मुंबईत एका 1 बीएचके फ्लॅटमध्ये शिफ्ट झालेत. हा फ्लॅट सोनू व सोनाली अन्य तीन लोकांसोबत शेअर करत. पण सोनालीने याबाबत कधीही तक्रार केली नाही.
सोनूने अॅक्टर बनू नये, असे सोनालीचे मत होते. पण नंतर सोनूमधील अभिनयप्रेम पाहून तिने त्याचा हा निर्णय मान्य केला. केवळ इतकेच नाही तर कायम त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
1999 मध्ये सोनूने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. तामिळ चित्रपट ‘कल्लाजहगर’मधून त्याने अॅक्टिंग डेब्यू केला. 2002 मध्ये त्याचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘शहीद-ए-आजम’ रिलीज झाला. परंतू त्याला खरी ओळख मिळाली ती ‘युवा’मधून. यानंतर कहां हो तुम, शीशा, आशिक बनाया आपने, जोधा अकबर, एक विवाह ऐसा भी, दबंग, बुड्ढा होगा तेरा बाप, मैक्सिमम, रमैया वस्तावैया, आर...राजकुमार आणि हैप्पी न्यू ईयर यासारख्या चित्रपटांत झळकला.