Join us

Birthday Special : जाणून घ्या, कोंकणा सेन शर्माबद्दलच्या काही खास गोष्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 2:46 PM

बॉलिवूडची गुणी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिचा आज (३ नोव्हेंबर) वाढदिवस. कोंकणाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

ठळक मुद्दे  सप्टेंबर २०१० मध्ये तिने बॉयफ्रेन्ड रणवीर शौरीसोबत  लग्न केले. लग्नाच्या सहा महिन्यानंतर कोंकणाने एका मुलाला जन्म दिला.

बॉलिवूडची गुणी अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिचा आज (३ नोव्हेंबर) वाढदिवस. कोंकणाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज ४० व्या वर्षांत पदार्पण करणा-या कोंकणाने कोलकात्याच्या इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले. यानंतर सेंट स्टिफन कॉलेजात ती शिकली. आज कोंकणाबद्दल काही खास गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

- कोंकणाला बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. १९८३ मध्ये ‘इंदिरा’ या बंगाली चित्रपटात ती बालकलाकार म्हणून झळकली होती.

कोंकणा सेनचे वडील मुकुल शर्मा सुप्रसिद्ध पत्रकार आहेत तर आई अपर्णा सेन एक नामांकित दिग्दर्शिका. कोंकणा आपल्या आई-वडिल दोघांचेही सरनेम आपल्या नावापुढे लावते.

शिक्षण पूर्ण झाल्यावर ‘एक जे आछे कन्या’ या बंगाली चित्रपटातून कोंकणाला लीड भूमिका मिळाली. या चित्रपटात ती नकारात्मक भूमिकेत दिसली. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि कोंकणा हिट झाली.

२००२ मध्ये कोंकणाने सुप्रसिद्ध दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांच्या ‘तितली’मध्ये भूमिका साकारली. यात कोंकणाची आई अपर्णा सेन आणि मिथुन चक्रवर्तीही होते.

२००५ मध्ये कोंकणाने मधूर भांडारकर यांच्या ‘पेज 3’ या हिंदी चित्रपटात लीड भूमिका साकारली. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. कोंकणाने आई अपर्णाने दिग्दर्शित केलेल्या ‘मि. अ‍ॅण्ड मिसेस अय्यर’ या इंग्रजी सिनेमात देखील तिने काम केले. याकरता तिला बेस्ट अ‍ॅक्ट्रेसचा नॅशनल अवॉर्ड मिळाला. ‘अकिरा’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या अलीकडे आलेल्या चित्रपटातही ती दिसली.

कोंकणाच्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. ‘आजा चल ले’ या चित्रपटाच्या सेटवर तिची रणवीर शौरीसोबत ओळख झाली. यानंतर दोघांचेही प्रेम झाले. यादरम्यान कोंकणा लग्नाआधीच प्रेग्नंट राहिली. यानंतर दोघांनीही घाईघाईत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

 सप्टेंबर २०१० मध्ये तिने बॉयफ्रेन्ड रणवीर शौरीसोबत  लग्न केले. लग्नाच्या सहा महिन्यानंतर कोंकणाने एका मुलाला जन्म दिला.

अर्थात मुलाच्या जन्मानंतर कोंकणा व रणवीर यांच्यातील आपसी मतभेद विकोपाला गेलेत. २०१५ मध्ये रणवीर व कोंकणा दोघांनीही आपसी सहमतीने एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला.  

टॅग्स :कोंकणा सेन शर्मा