Birthday Special : नशेत तर्र असलेल्या या अभिनेत्याने पूजा भटला केले होते रक्तबंबाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 08:00 AM2020-02-24T08:00:00+5:302020-02-24T08:00:02+5:30

आज पूजाचा वाढदिवस

Birthday Special ranvir shorey and pooja bhatt scandalous affair | Birthday Special : नशेत तर्र असलेल्या या अभिनेत्याने पूजा भटला केले होते रक्तबंबाळ

Birthday Special : नशेत तर्र असलेल्या या अभिनेत्याने पूजा भटला केले होते रक्तबंबाळ

googlenewsNext
ठळक मुद्दे2003मध्ये पूजाने मनीषा मखीजासोबत लग्न केले आणि सगळ्यांचा धक्का दिला.

महेश भटची लेक पूजा भट एकेकाळी रूपेरी पडद्यावर राज्य करायची. पण हळूहळू तिच्या करिअरचा ग्राफ असा काही घसरला की, अ‍ॅक्टिंगच्या दुनियेतून ती बाद झाली. याला कारण ठरली ती तिची पर्सनल लाईफ़. पर्सनल लाईफमुळे पूजा अधिक चर्चेत राहिली. सर्वाधिक चर्चा झाली ती तिच्या व अभिनेता रणवीर शौरीच्या अफेअरची.
आज पूजाचा वाढदिवस. यानिमित्त बी-टाऊनमध्ये गाजलेल्या या लव्हअफेअरबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खरे तर बॉलिवू़डमध्ये एंट्री घेतल्या घेतल्या पूजाचे नाव तिच्या अनेक को- स्टार बरोबर जोडले गेले. पूजा ज्याही चित्रपटात काम करायची तिच्या अफेअरची व्हायची.‘दिल है कि मानता नही’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिचे नाव आमिर खानसोबत जोडण्यात आले. यानंतर तिचे नाव बॉबी देओलसोबत सोडण्यात आले आणि यानंतर काही दिवसांनी रणवीर शौरीसोबत देखील तिच्या अफेअरची चर्चा रंगली. 

पूजा व रणवीरचे अफेअर सुुरू झाले ते ‘जिस्म’च्या सेटवर. या चित्रपटात रणवीरची एक छोटीशी भूमिका होती. याचदरम्यान पूजा व रणवीर एकमेकांच्या जवळ आलेत. काहीच दिवसांत दोघेही लिव्ह-इनमध्ये राहू लागले. पूजाचा भाऊ राहुल भट याला हे नाते मान्य नव्हते. तरीही पूजा रणवीरला सोडायला तयार नव्हती. सगळे काही ठीक सुरु असतानाच एकदिवस असे काही झाले की, या लव्हस्टोरीचा नेहमीसाठी अंत झाला.

असे म्हणतात की, रणवीरच्या दारूच्या व्यसनामुळे पूजा प्रचंड तणावात होती. नशेत तर्र होऊन रणवीर पूजाला सर्रास मारहाण करायचा. एकदिवस रणवीर घरी आला तो नशेत तर्र होऊन. तरीही पूजाने त्याला घरात घेतले. पण रणवीरने काहीच कारण नसताना पूजाला बघताच तिला मारहाण सुरु केले. इतके की, पूजा रक्तबंबाळ झाली.  

खुद्द पूजाने एका मुलाखतीत ही घटना सांगितली होती. ‘एका रविवारी रणवीर माझ्या घरी आला. तो नशेत तर्र होता. मी तरीही त्याला घरात घेतले. पण त्याने मला पाहताक्षणी मारायला सुरूवात केली. त्यावेळी माझ्यावर सर्जरी झाली होती. रणवीरने इतकी अमानुष मारहाण केली की, मी रक्त वाहू लागले,’ असे तिने सांगितले होते. पुढे पूजाने रणवीरविरोधात एफआयआरही दाखल केली होती.

 अनेक वर्षांनी रणवीरही या प्रकरणावर बोलला होता. पूजा खूप दारू प्यायची आणि हिंसक व्हायची, असे तो म्हणाला होता. या प्रकरणात कोण खोटे, कोण खरे माहित नाही. पण दोन्हीकडून तणाव वाढला आणि ही लव्हस्टोरी संपली.

2003मध्ये पूजाने मनीषा मखीजासोबत लग्न केले आणि सगळ्यांचा धक्का दिला. मनीषचे दूर-दूरपर्यंत बॉलिवूडशी संबंध नव्हता तो टीव्हीवर अँकरिंग करायचा.  मनीष आणि पूजाची ओळख पाप फिल्मच्या सेटवर झाली होती. या चित्रपटातून पूजाने बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक म्हणून  पदार्पण केले होते. या चित्रपटात काम करण्यासाठी मनीषने एका पाकिस्तानी बँडला  ज्या पद्धतीने तयार केले होते, ते बघून पूजा इंप्रेस झाली होती. याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांमधील जवळीकता वाढत गेली. पुढे लग्नही झाले. पण दोघांच्या लाईफ स्टाईलमध्ये खूप अंतर होते.  त्यामुळे कालांतराने त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या घटस्फोटाला रणवीर शौरीपण जबाबदार असल्याच्या अनेक चर्चा झाल्या होत्या. असे म्हणतात की, लग्नानंतर ही पूजा रणवीरला विसरु शकली नव्हती.  

Web Title: Birthday Special ranvir shorey and pooja bhatt scandalous affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.