Join us

Birthday Special :  दुस-या लग्नासाठी शम्मी कपूर यांनी ठेवली होती ही अट, घाबरले होते कुटुंबीय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 8:00 AM

शम्मी कपूर यांनी दोन लग्ने केलीत. पण दुस-या लग्नावेळी त्यांनी अशी काही अट ठेवली होती की, आजही बॉलिवूडमध्ये त्याची चर्चा होते.

ठळक मुद्दे 14 ऑगस्ट 2011 रोजी शम्मी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता.  

21 ऑक्टोबर  म्हणजे, शम्मी कपूर यांची  बर्थ अ‍ॅनिव्हर्सरी. शम्मी कपूर यांच्या डान्सचे अनेकजण ‘दिवाने’ होते.  21 ऑक्टोबर  1931 रोजी मुंबईत जन्मलेले शम्मी कपूर म्हणायला कपूर कुटुंबात जन्मले. पण त्यांचे आयुष्य सोपे नव्हते. याचे कारण म्हणजे, शम्मी यांना स्वबळावर आपले आयुष्य घडवायचे होते.  50 रूपये पगाराची पहिली नोकरी त्यांनी स्वीकारली होती ती त्यामुळेच.  शम्मी कपूर यांनी दोन लग्ने केलीत. पण दुस-या लग्नावेळी त्यांनी अशी काही अट ठेवली होती की, आजही बॉलिवूडमध्ये त्याची चर्चा होते.

अभिनेत्री गीता बालीसोबत त्यांनी गूपचूप लग्न केले होते. पण 1965 मध्ये वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी गीता बाली यांचे निधन झाले होते. पत्नीच्या निधनाने शम्मी कपूर कोलमडून गेले होते. त्यांनी स्वत:कडे लक्ष देणे सोडून दिले होते. त्यामुळे त्यांचे वजन खूप वाढले. वाढलेल्या वजनामुळे हीरो म्हणून त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली आणि हळूहळू त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले. गीता बाली व शम्मी यांना दोन मुले होती. 

मुले लहान असल्याने घरच्यांनी शम्मी यांच्यावर दुस-या लग्नासाठी दबाव टाकणे सुरु केले. नीला देवीसोबत शम्मी यांनी लग्न करावे, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. पण शम्मी कपूर मानेनात. घरच्यांचा दबाव इतका होता की, अखेर शम्मी कपूर दुसºया लग्नासाठी तयार झालेत. पण काही अटींवर. होय, शम्मी यांनी नीला देवींसमोर  काही अटी ठेवल्या. यापैकी पहिली अट कुठली तर अर्ध्या रात्री मंदिरात लग्न करण्याची.

होय, 1955 मध्ये बाणगंगा मंदिरात अर्ध्या रात्री गीता बालीसोबत लग्न केले होते, तसेच लग्न करायचे, ही त्यांची पहिली अट होती. दुसरी अट होती, नीला देवींनी कधीही आई न बनणे. नीला देवींनी या दोन्ही अटी मान्य केल्या.  नीला देवी कधीच आई बनल्या नाहीत. शम्मी कपूर व गीता बाली यांच्या मुलांना त्यांनी आपलेसे केले.  

टॅग्स :शम्मी कपूर