बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा आज ६४वा वाढदिवस साजरा करतो आहे. सनी देओलने गदर, घायल आणि बॉर्डरसारख्या चित्रपटातील दमदार भूमिकेतून बॉलिवूडमध्ये आपली छाप उमटविली आहे. इतकेच नाही तर त्याने राजकारणातही प्रवेश केला आहे. २०१९मध्ये पंजाबमधील गुरदासपूरमध्ये खासदार असलेला सनी देओल राजकारणात खूप लोकप्रिय आहे. सनी देओलच्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं तर तो कोट्याधीश आहे.
२०१९ सालच्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात सनी देओलकडून दिलेल्या माहितीच्या अनुसार, सनी देओल आणि त्याची पत्नी ८७.१८ कोटी रुपयांची मालक आहे. या प्रतिज्ञापत्रात सांगितले होते की, त्यांनी २०१७-१८मध्ये ६३.८२ लाख रुपये, २०१६-१७ साली ९६.२९ लाख रुपये आणि २०१५-१६ साली २.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्याच्याकडे ६०.४६ कोटी रुपये जंगम संपत्ती आणि २१ कोटी रुपयांची अचल मालमत्ता आहे.
यादरम्यान सनी देओलकडे २६ लाख रुपये कॅश होती आणि त्याची पत्नी लिंडा देओलकडे १६ लाख रुपये होते. त्यात सनी देओलच्या बँकेतील खात्यात ९.३६ लाख रुपये आहे आणि त्याने १.४३ लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासोबतच त्याच्याकडे १.६९ कोटींची कार आहे. यासोबतच त्याच्याकडे १.५६ कोटींची ज्वेलरी आहे. याशिवाय त्याच्याकडे २१ कोटी रुपयांची जमीन आहे. ज्यात अॅग्री कल्चर आणि नॉन अॅग्रीकल्चर आणि मुंबईचा एक फ्लॅट सामील आहे. सनी देओलने १९७७-७८मध्ये बर्घिंघमध्ये अॅक्टिंग आणि थिएटरमध्ये डिप्लोमा केला आहे.
हेमा मालिनी यांची संपत्ती पाच वर्षांत ३४.४६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
एडीआरच्या नुसार, हेमा धर्मेंद्र मालिनी आणि धर्मेंद्र देओलकडे २०१९ साली एकूण २५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. २०१४ पासून २०२० पर्यंत या मालमत्तेत ७२ कोटींची वाढ झाली आहे.