बॉलिवूडची एकेकाळची देखणी अभिनेत्री म्हणजे योगिता बाली.योगिता बाली यांचा आज वाढदिवस. 1971 साली ‘परवाना’ या चित्रपटातून योगिता बालींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पुढच्या काळात विनोद खन्ना, देव आनंद, संजीव कुमार, राजेश खन्ना, रणधीर कपूर, सुनील दत्त अशा त्याकाळच्या बड्या हिरोंसोबत योगिता बालींनी काम केले. पण त्यांना म्हणावे तसे यश मिळवता आला नाही. चित्रपटांपेक्षा त्या आपल्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिल्या.
किशोर कुमार यांच्याशी घटस्फोट अन् मिथुन चक्रवर्ती यांच्याशी लग्न
24 वर्षी योगिता बाली यांनी 1976 मध्ये किशोर कुमार यांच्यासोबत लग्न केले. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. दोनच वर्षांत योगिता बाली आणि किशोर कुमार यांचा घटस्फोट झाला. याचे कारण म्हणजे योगिता बाली यांच्या आयुष्यातील मिथुन चक्रवर्ती यांची एन्ट्री.
किशोर कुमार यांच्याशी घटस्फोट घेऊन योगिता बालींनी 1979 मध्ये मिथुन यांच्यासोबत संसार थाटला. या अफेअर आणि लग्नामुळे किशोर कुमार इतके संतापले होते की, त्यांनी त्यानंतर कधीच मिथुन यांच्यासाठी गाणे गायले नाही.
किरणकुमारसोबतही होते अफेअर
असे म्हणतात की, फिल्म इंडस्ट्रीत योगिता बाली यांचे सर्वात पहिले अफेअर अभिनेता किरण कुमारसोबत होते. पण योगिता बाली यांच्या एका जवळच्या मैत्रिणीमुळे हे नाते संपले. ही जवळची मैत्रिण कोण तर रेखा.
रेखा यांनी दिला धोका