Join us

आजोबांनी शेअर केला नात मेहरचा पहिला फोटो, नेहा धूपियाच्या चाहत्यांना सुपर सरप्राईज!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 1:44 PM

कालचं  नेहाने तिच्या चिमुकलीचा फोटो पोस्ट केला होता. शिवाय तिचे ‘मेहर’ असे नामकरण करण्यात आल्याचेही सांगितले होते. पण या फोटोत केवळ तिच्या चिमुकले पाय तेवढे दिसले होते. त्यामुळे चाहते नेहाच्या मुलीचा चेहरा पाहण्यास उत्सूक होते.

ठळक मुद्देनेहाचे सासरे आणि सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांनी चाहत्यांची उत्सुकता अचूक हेरली व नातीचा एक फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला.

गत १८ नोव्हेंबरला नेहा धूपिया व अंगद बेदी यांच्या घरी कन्यारत्नाने जन्म घेतला. कालचं  नेहाने तिच्या चिमुकलीचा फोटो पोस्ट केला होता. शिवाय तिचे ‘मेहर’ असे नामकरण करण्यात आल्याचेही सांगितले होते. पण या फोटोत केवळ तिच्या चिमुकले पाय तेवढे दिसले होते. त्यामुळे चाहते नेहाच्या मुलीचा चेहरा पाहण्यास उत्सूक होते. नेहाचे सासरे आणि सुप्रसिद्ध माजी क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांनी चाहत्यांची ही उत्सुकता अचूक हेरली व नातीचा एक फोटो आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केला. होय, या फोटोत नेहाच्या चिमुकलीचा गोंडस चेहरा स्पष्ट दिसतोय. आजोबांनी केवळ नातीचा फोटोच शेअर केला नाही तर सोबत एक सुंदर पोस्टही लिहिली.

‘माझी प्रिय नात मेहर, तू आपल्या आजोबांची आणखी एक लाईफलाईन बनली आहेत. तू आमच्या आयुष्यात यावी, यापेक्षा दुसरा मोठा आनंद नाही. परमेश्वर तुला नेहमी आनंदी ठेवो. तुझे या जगात स्वागत...’, असे बिशन सिंह यांनी लिहिले.याचवर्षी १० मे रोजी नेहा व अंगदचे लग्न झाले. लग्नाआधीचं नेहा प्रेग्नंट होती. त्यामुळे दोघांनीही घाईघाईत लग्न उरकले. अर्थात यादरम्यान आपल्या प्रेग्नंसीची गोष्ट तिने जगापासून लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती.  चार वर्षांपूर्वीच अंगदने नेहाला लग्नासाठी प्रपोज केले होते. पण तेव्हा नेहा कुण्या दुस-यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण हे रिलेशनशिप तुटल्यानंतर नेहा व अंगद यांची जवळीक वाढली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदी याने क्रिकेट विश्वात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्ष क्रिकेट खेळणा-या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. रेमो डिसूझा दिग्दर्शित ‘फालतू’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याशिवाय  उंगली, पिंक, टायगर जिंदा है  या चित्रपटांतूनही तो झळकला होता.

टॅग्स :नेहा धुपिया