Join us  

Sonali Phogat death : तिच्या जेवणात काही तरी..., सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर बहिणीने व्यक्त केला संशय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 3:26 PM

Sonali Phogat death : ‘बिग बॉस 14’मुळे चर्चेत आलेल्या टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.  अशात आता सोनाली यांच्या बहिणीनं खळबळजनक आरोप केला आहे.

बिग बॉस 14’मुळे चर्चेत आलेल्या टिकटॉक स्टार आणि हरियाणातील भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचं आज गोव्यात निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. सोनाली फोगाट यांच्या मृत्यूची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे.  अशात आता सोनाली यांच्या बहिणीनं खळबळजनक आरोप केला आहे. माझी बहिण सोनालीच्या जेवणात काही तरी गडबड होती, असा आरोप तिने केला आहे.  

काय म्हणाली सोनाली यांची बहिणसोनाली यांची बहिण रूपेश हिने सोनाली यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा आरोप करताना ती म्हणाली, ‘माझी बहिण सोनाली हिच्याशी मी परवाच बोलले होते. ती एकदम ठणठणीत होती. पण  हृदयविकाराचा झटका येण्याआधी तिचं आईबरोबर बोलणं झालं होतं. फोनवर बोलताना सोनाली थोडी अस्वस्थ होती.   माझ्या जेवणात काही तरी गडबड आहे, अशी शंका तिनं आईकडे बोलून दाखवली होती. माझ्या शरिरात काही गडबड वाटत असल्याचं तिनं आईला सांगितलं होतं. काल संध्याकाळीहीी तिच्याविरोधात कुणीतरी कट रचत असल्याचं तिने आईला बोलून दाखवलं होतं. काल माझी बहिण माझ्या आईशी बोलली आणि सकाळी आम्हाला तिच्या मृत्यूची बातमी मिळाली.  अद्याप सोनाली यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला नाही.  पोस्टमर्टम रिपोर्टमधून सोनालीच्या यांच्या मृत्यूचं खरं कारण सर्वांसमोर येणार आहे.

 सोनाली यांचे पती संजय फोगाट हे भाजप नेते होते. त्यांच्या निधनानंतर सोनाली यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. हरियाणातील भाजपची महिला उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.  सोनाली यांनी टेलिव्हिजनवरही अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केलं होतं. सोनाली सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय होत्या.  सोनालीआधी 2016मध्ये सोनाली यांचा पती संजय फोगट यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. हरियामामधील एका फार्म हाऊसमध्ये त्यांचा संशयास्पद मृतदेह आढळला होता.  सोनाली या बिग बॉस 15मध्ये सहभागी झाल्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते.

टॅग्स :सेलिब्रिटीबिग बॉसभाजपाहरयाणा