हिंदूंच्या भावनांचा अनादर केल्याप्रकरणी अॅमेझॉन प्राईमची वेब सीरिज तांडव ही वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तांडव या वेब सीरिजविरोधात अनेक ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसंच केंद्रानंही याची दखल घेतली आहे. दरम्यान, या वेब सीरिजमधील आक्षेपार्ह दृश्ये काढली जात नाहीत तोवर यावर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचं भाजप नेते राम कदम यांनी सांगितलं होतं. तसंच या वेब सीरिजविरोधात उत्तर प्रदेशात एफआयआर दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलिसांची एक टीमही आली आहे. दरम्यान, या प्रकरणावरून राम कदम यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे."तांडव या वेब सीरिजवरील तक्रारीच्या चार दिवसांनंतरही महाराष्ट्र सरकारनं मुंबई पोलिसांना एफआयआर करण्यापासून थांबवलं आहे. आता तांडव काय असतं हे आम्ही चित्रपटसृष्टीतील बदमाशांना दाखवून देऊ. आमच्या विश्वासावर आम्ही कोणालाही प्रहार करून देणार नाही," असं राम कदम म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे."योगी सरकारच्या पोलिसांचा सर्व राम आणि शिव भक्तांकडून मुंबईत स्वागत आहे. जे काम ठाकरे सरकारला करायला हवं होतं ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. ४ दिवस होऊन गेले आहेत. अजूनही महाराष्ट्र सरकार तांडवच्या टीमला वाचवू पाहत आहे," असा आरोपही कदम यांनी केला आहे.
'तांडव' काय असतं हे आता चित्रपटसृष्टीतील बदमाशांना दाखवून देऊ : राम कदम
By जयदीप दाभोळकर | Updated: January 20, 2021 13:30 IST
अनेक ठिकाणी तांडव या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आल्या तक्रारी
'तांडव' काय असतं हे आता चित्रपटसृष्टीतील बदमाशांना दाखवून देऊ : राम कदम
ठळक मुद्देअनेक ठिकाणी तांडव या वेब सीरिजविरोधात दाखल करण्यात आल्या तक्रारीराज्य सरकार तांडवच्या टीमला वाचवू पाहत आहे, राम कदम यांचा आरोप