ब्लॅक पँथर फेम अभिनेत्री कॅरी बर्नास (carrie bernans) हिचा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भीषण अपघात झाला आहे. स्टंटवूमन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कॅरीचा अपघात प्रचंड भयंकररित्या झाला असून त्यात तिचा अनेक ठिकाणी फॅक्चर झालं आहे. इतंकच नाही तर तिचा हात आणि दात सुद्धा तुटले आहेत. कॅरीच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी रोजी कॅरीचा हा अपघात झाला. हा अपघात म्हणजे हिट अँड रन प्रकरण असून तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असतानाच तिच्या शरीरात अनेक ठिकाणी फ्रँक्चर असल्याचं लक्षात आलं. इतकंच नाही तर तिचे दात सुद्धा तुटले आहेत.
कॅरी बर्नासची आई पेट्रीसियानं हिने कॅरीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये कॅरी हॉस्पिटलच्या बेडवर निपचित पडून आहे. तसंच तिच्या शरीरात अनेक सलाइन लावल्या आहेत. इतकंच नाही तर तिला ऑक्सिजन पुरवठा करण्यात येत असून व्हेंटिलेटर सुद्धा लावण्यात आलं आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिच्या आईने तिचे हेल्थ अपडेट दिले आहेत.
काय म्हणाली कॅरीची आई?
तिला अजूनही खूप त्रास होतोय. समोरच्या व्यक्तीला ती प्रतिसाद देऊ शकत नाहीये. आपण काय बोलतोय हे तिला कळत नाहीये. हे फार त्रासदायक आहे. तिच्यासाठी प्रार्थना करा. तिला खूप त्रास होतोय, असं कॅरीच्या आईने म्हटलं आहे.
दरम्यान, कॅरी तिच्या मित्रांसोबत वॉक करत होती. याचवेळी एका भरधाव वेगाने आलेल्या कारने तिला जोरात धडक दिली. ज्या व्यक्तीच्या गाडीने तिला धडक दिली त्याच गाडीने त्यापूर्वी अनेक गाड्यांना ठोकर दिल्यांचही सांगण्यात येत आहे.