Join us

Blackbuck Poaching Case : सलमानच्या शिक्षेवर बॉलिवूड सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 11:32 IST

काल बॉलिवूड कलाकारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता यावर काही कलाकारांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. 

सलमान खान याच्या जामीन अर्जावर होणारी आजची सुनावणी राखून ठेवली आहे. त्यामुळे त्याला पुन्हा एक रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमानला काल जोधपुर कोर्टाने काळवीच शिकारप्रकरणी 5 वर्षांची शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. या निर्णयावर काल सोशल मीडियात चांगलाच हशा पिकला. अनेकांनी यावरुन जोक्स तयार केले. पण काल बॉलिवूड कलाकारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण आता यावर काही कलाकारांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. 

दिग्दर्शक सुभाष घई, अभिनेता अर्जून रामपाल, कबीर बेदी, गायिका सोना महोपात्रा यांनी ट्विट केलं आहे. 

 

टॅग्स :काळवीट शिकार प्रकरण