Join us

Blackbuck poaching case : सलमान खानचा आत्तापर्यंतचा क्राईम रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 12:51 PM

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान दोषी ठरवण्यात आले असून बाकी सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया सलमान खानचा आत्तापर्यंतचा क्राईम रेकॉर्ड...

मुंबई : अभिनेता सलमान खान आणि अन्य चार बॉलिवूड कलाकारांविरोधातील 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी गुरूवारी जोधपूर न्यायालय अंतिम निकाल देण्यात आला आहे.  या प्रकरणी सलमान खान दोषी ठरवण्यात आले असून बाकी सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया सलमान खानचा आत्तापर्यंतचा क्राईम रेकॉर्ड...

सप्टेंबर 1998 काळवीट शिकारप्रकरण : ही घटना हम साथ साथ है या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान घडली होती. याचप्रकरणी सलमान खान याला दोषी ठरवण्यात आलंय. सलमानसह सैफ अली खान, तब्बू, नीलम आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर आरोप होता की, राजस्थानमधील जोधपुरजवळील कणकणी गावात काळवीटाची शिकार केली. 

आर्म्स अॅक्ट केस 1998 : ऑक्टोबर 1998 मध्ये पोलिसांनी सलमान खान याच्यावर कथित 0.22 ची रायफल आणि 0.32 ची पिस्तुल ठेवण्याबाबत आणि काळवीट शिकारप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. मात्र, 18 जानेवारी 2017 मध्ये जोधपूर कोर्टाने सलमान खान याला मोठा दिलासा देत आर्म्स अॅक्ट केस प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. 

1998 काळवीट शिकार प्रकरण : 1998 मध्ये झालेल्या याप्रकरणात सलमान खान याच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. त्याच्यावर दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. आरोपांनुसार, 26 आणि 27 सप्टेंबर 1998 ला राजस्थानच्या भवाद गावात दोन काळवीटांची शिकार केली. यासोबतच 28 आणि 29 सप्टेंबर 1998 ला मथानियामध्येही एका काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. मात्र 25 जुलै 2016 ला राजस्थान हायकोर्टाने सलमान खानला याप्रकरणातून निर्दोष सोडले होते. कोर्टाने म्हटले होते की, सलमानच्या बंदुकीने ही शिकार करण्यात आली याचे पुरावे नाही आहेत.

28 सप्टेंबर 2002 हिट अॅंन्ड रन केस : सलमान खानवर 28 सप्टेंबर 2002 ला रात्री त्याने वांद्रेत आपल्या लॅंड क्रुजर कारने फुटपाथवर झोपलेल्या लोकांवर गाडी चढवली. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. तर चार लोक जखमी झाले होते. मे 2015 मध्ये याप्रकरणी ट्रायल कोर्टाने सलमान खानला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर मुंबई हाय कोर्टाने डिसेंबर 2015 मध्ये सलमान खान याला या प्रकरणातून निर्दोष सोडले होते. 

टॅग्स :काळवीट शिकार प्रकरण