बॉलिवूडची क्वीन अर्थात कंगणा रणौत (kangana ranaut) तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत येत असते. परंतु, सध्या ती तिच्या 'रिव्हॉल्व्हर रानी' या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. या सिनेमामध्ये कंगणाने अभिनेता वीर दास याच्यासोबत किसिंग सीन दिला. परंतु, हा सीन करत असताना कंगणाने चक्क अभिनेत्याच्या ओठातून रक्त काढल्याचं म्हटलं जात आहे. या प्रकरणी आता कंगणाने स्पष्टीकरण दिलं आहे.
'रिव्हॉल्व्हर रानी' या सिनेमाचं २०१४ मध्ये चित्रीकरण झालं. या सिनेमामध्ये कंगणा आणि वीरदास याचा एक किसिंग सीन होता. परंतु, हा सीन देताना कंगणाने वीरदासच्या ओठातून रक्त येईपर्यंत त्याला किस केलं. याविषयी स्पष्टीकरण देत कंगणाने सोशल मीडियावर एक स्क्रिनशॉट शेअर केला आहे. तसंच घडलेल्या प्रकाराविषयी भाष्य केलं आहे.
"मी हृतिक रोशननंतर बिचाऱ्या वीर दासची अब्रू लुटली? हे कधी झालं? " असा प्रश्न विचारत तिने हे आर्टिकल शेअर केलं आहे.
दरम्यान, कंगणा तिच्या सडेतोड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. कलाविश्वात घडणाऱ्या अनेक घटनांवर तिने उघडपणे भाष्य केलं आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये ती कायम चर्चेत असतं. कंगणा लवकरच ‘इमरजेंसी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे.