Adity Roy Kapoor : बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत आदित्य रॉय कपूरचं(Adity Roy Kapoor) नाव अव्वल स्थानावर येतं. आदित्य त्याच्या प्रोफेशनल लाईफबरोबरच वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत येत असतो. नुकतंच आदित्यचं अभिनेत्री अनन्या पांडेबरोबर(Ananya Pande) नाव जोडलं गेलं होतं. त्यादरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या होत्या. अनन्या पांडे आणि अभिनेता आदित्य रॉय कपूर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण, गेल्या मार्च महिन्यातच त्यांचं ब्रेकअप झालं. त्यावर अभिनेता पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे.
नुकतीच आदित्यने करीना कपूरचा चॅट शो 'व्हॉट वुमन वॉन्ट' मधे हजेरी लावली. याचा प्रोमो सोशल मीडियावर समोर आला आहे. त्यावेळेस करीना अभिनेत्याला त्याच्या आवडत्या तीन गोष्टी कोणत्या ? असा प्रश्न विचारते. त्यावर उत्तर देताना आदित्य म्हणतो, "मी हॅंडसम आहे, स्टायलिश आहे शिवाय यावेळी मी पूर्णपणे चिल करतो आहे".
पुढे करीना त्याचं उत्तर ऐकून दुसरा प्रश्न विचारते, तुझ्या बऱ्याच चाहत्यांना रिलेशनशिप स्टेटसबद्दल जाणून घ्यायचं आहे. त्यादरम्यान अनन्यासोबतच्या नात्यावर अभिनेत्याने पहिल्यांदाच मौन सोडलं. "मी माझं आयुष्य टेन्शन फ्री जगतो. मला असंच राहायला आवडतं. 'आशिकी' या चित्रपटाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली. त्यात मी मद्यपीची भूमिका साकारली होती म्हणून मी तसाच आहे असं नाही.".
त्यानंतर करीनाने विचारलं, "रिलेशनशिप घोस्टिंग(कोणत्याही कारणाशिवाय अचानक नातं तुटलं) तर या गोष्टी कशा पद्धतीने हॅंडल करतोस. त्यावर उत्तर आदित्य म्हणाला, मला जास्त फोन वापरायला आवडत नाही. शिवाय मला जर कोणी सारखं सारखं मेसेज, फोन करून डिस्टर्ब करत असेल तर मी सरळ त्या व्यक्तीला ब्लॉक करतो".