२०२० व २०२१ वर्षाबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयने आगामी सहा चित्रपटांच्या घोषणा केल्या आहेत आणि या चित्रपटांच्या रिलीज डेटही जाहीर केले आहेत. तुम्ही हे ऐकून हैराण व्हाल की मोठे मोठे कलाकार एका वर्षात फक्त एकाच सिनेमात काम करतात. मात्र अक्षय कुमार आगामी १५ महिन्यात सहा चित्रपटात झळकताना दिसणार आहे. हे आहेत त्याचे आगामी चित्रपट
सुर्यवंशी: रोहित शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपट पोलिसांवर आधारीत असून २७ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पोलिसांच्या गणवेशात कतरिना कैफ सोबत रोमान्स करताना आणि गुंड्यांसोबत दोन हात करताना दिसणार आहे.
लक्ष्मी बॉम्ब: लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट अक्षय कुमारच्या करियरमधील सर्वात चांगला चित्रपट ठरू शकतो. यात तो एकदम वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. लक्ष्मी बॉम्ब यावर्षी ईदच्या दिवशी सलमान खानच्या राधे - युअर मोस्ट वॉण्टेड भाईसोबत बॉक्स ऑफिसवर धडकेल.
पृथ्वीराज: यशराज बॅनरच्या अंतर्गत बनत असलेला पृथ्वीराज हा चित्रपट पिरिएड ड्रामा आहे. यात अक्षय कुमारसोबत मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.मानुषीने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
बच्चन पांडे: साजिद नाडियादवाला यांच्या बॅनरखाली बनत असलेला चित्रपट बच्चन पांडे चित्रपटात अक्षय कुमार व कृति सेनॉन दिसणार आहे. हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसला रिलीज होणार होता. पण आता निर्मात्यांनी २०२१ साली २२ जानेवारीला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
अतरंगी रे: दिग्दर्शक आनंद एल राय यांनी नुकतेच अतरंगी रेमध्ये अक्षय कुमार असल्याचे जाहीर केले आहे. अक्षयसोबत या चित्रपटात धनुष व सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अतरंगी रे १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
बेल बॉटम: निखिल अडवाणी यांच्या बॅनर निर्मित बेल बॉटम चित्रपटात अक्षय कुमार एका गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातील अक्षयची भूमिका खूप वेगळी असणार आहे. हा चित्रपट २ एप्रिलला रिलीज होणार आहे.