Join us

Video : “सदृढ व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक; कारण तो पेट्रोल, टॅक्स..,” पाहा काय म्हणाले अनुपम खेर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 3:51 PM

Anupam Kher : गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठलाय. तर अनेक लोक आता पुन्हा सायकलकडे वळले आहेत. अनुपम खेर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Anupan Kher Social Media Video : 'द कश्मीर फाईल्स’नंतर (The Kashmir Files) सातत्यानं चर्चेत असलेले अनुपम खेर (Anupam Kher) हे त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या अनोख्या शैलीसाठी ओळखले जातात. अनुपम खेर हे कायमच त्यांचे विचार त्यांचे सर्वात खास मित्र म्हणजे त्यांच्या चाहत्यांशी शेअर करायला विसरत नाहीत. त्याला अनेकांची पसंतीदेखील मिळते. परंतु यावेळी त्यांनी आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर असा एक व्हिडिओ शेअर केला आहे जो खरोखरच तुम्हाला थक्क करेल. अनुपम खेर यांचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price Hike) सातत्याने वाढ होत आहे. अनेक जण आता आपल्या स्कूटर आणि गाड्या सोडून सायकलला प्राधान्य देताना दिसत आहेत. दुसरीकडे, अनपुम खेर यांचा हा व्हिडीओ नक्कीच तुम्हाला थक्क करेल. “सायकलींग कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी म्हणजेची जीडीपीसाठी अतिशय हानिकारक आहे. हे हास्यास्पद वाटत असेल, तरी कटू सत्य आहे. एक सायकल चालवणारा देशासाठी मोठी समस्या आहे. कारण तो गाडी खरेजी करत नाही, कर्ज घेत नाही, गाडीचा विमा करावा लागत नाही, इंधन खरेदी करत नाही, गाडीचं सर्व्हिसिंग करत नाही, पैसे देऊन गाडी पार्कही करवत नाही, तर तो जाडही होत नाही,” असं अनुपम खेर व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. “हे सदृढ व्यक्ती अर्थव्यवस्थेसाठी बिलकुल योग्य नाही. कारण तो औषधं घेत नाही, त्याला त्याची गरजच पडत नाही. तो दवाखान्यात जात नाही, कारण त्याला त्याची गरजच पडत नाही. तो डॉक्टरांनाही भेटत नाही. तो देशाच्या जीडीपीमध्ये काहीच मदत करत नाही. याऊलट फास्ट फूडची दुकानं ३० नोकऱ्या देतात. १० डॉक्टर, १० तंत्रज्ञ, १० वजन कमी करणारे, निरनिराळे लोक. चालणारी व्यक्ती तर अजून धोकादायक आहे, कारण तो तर सायकलही विकत घेत नाही,” असं त्यांनी सांगितलं.

यासोबतच व्हिडीओच्या अखेरिस आपण व्यंगात्मक पद्धतीनं हे सर्व काही म्हटल्याचा खुलासाही त्यांनी केला. मी सायकलवाल्यांची किंवा गरीबांची खिल्ली उडवत आहे असं कोणीही मानू नका, असंही अनुपम खेर म्हणाले. त्यांच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.

टॅग्स :अनुपम खेरबॉलिवूडसोशल मीडियाइन्स्टाग्राम