Salman Khan : जेव्हा एका लहान मुलासाठी सलमाननं केली होती बोन मॅरो टेस्ट, सुनील शेट्टीनं सांगितला 'तो' किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 05:59 PM2023-05-24T17:59:50+5:302023-05-24T18:00:56+5:30

सुनील शेट्टीनं सलमान बाबतचा एक किस्सा सर्वांसोबत शेअर केलाय.

bollywood actor bhaijan Salman Khan did a bone marrow test for a boy Suniel Shetty told the story | Salman Khan : जेव्हा एका लहान मुलासाठी सलमाननं केली होती बोन मॅरो टेस्ट, सुनील शेट्टीनं सांगितला 'तो' किस्सा

Salman Khan : जेव्हा एका लहान मुलासाठी सलमाननं केली होती बोन मॅरो टेस्ट, सुनील शेट्टीनं सांगितला 'तो' किस्सा

googlenewsNext

बॉलीवूड मधल्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे भाईजान सलमान खान. गरुजू लोकांपासून ते गरीब मुलांसाठी अनेकदा सलमाननं मदतीचा हात पुढे केलाय. परंतु सलमान आपहून कधीही याबाबत चर्चा करताना दिसत नाही. परंतु यावरून बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी त्याचं कौतुक करताना दिसतात. यापैकीच एक म्हणजे सुनील शेट्टी.सुनील शेट्टी आणि सलमान यांच्यातील मैत्री घट्ट असल्याचं म्हटलं जातं.

अनेकदा सुनील शेट्टीनं सलमानचं कौतुकही केलंय. माझ्याइतकं कोणीही सलमानला ओळखत असेल असं वाटत नाही, असं सुनील शेट्टीनं यापूरवीही म्हटलं होतं. एक दोनदाच नाही तर अनेकदा सुनील शेट्टीनं सलमान खानच्या कामाबद्दल त्याचं कौतुक केलंय.

“आजही सलमान यशाच्या या शिखरावर आहे कारण त्याचं मन चांगलं आहे. तुम्हाला त्याला ओळखण्याची गरज आहे. तो एक गोल्डन हार्ट असलेल्या व्यक्ती आहे. तुम्ही काहीही मागा तो तुम्हाला ते देईल,” असं सुनील शेट्टीनं एका मुलाखतीदरम्यान सांगिंतलं होतं. दरम्यान, सुनील शेट्टीनं सलमानबाबतचा एक किस्सा ऐकवला.

त्याचा फोन वाजत होता…

मला आताही आठवतंय तेव्हा त्याला सातत्यानं कोणाचातरी फोन येत होता. तो त्या ठिकाणी गेला. मी त्यावेळी त्याला विचारलं कुठे जातोय? पण त्यानं काहीच सांगितलं नाही. माझं एक काम आहे आणि ते पूर्ण झालं की मी परत येईन असं तो म्हणाल्याचं सुनील शेट्टीनं सांगितलं. “एका मुलासाठी तो बोन मॅरो टेस्ट करायला गेला होता हे मला नंतर समजलं. त्या मुलाला बोन मॅरो कॅन्सर होता.  मला जितकं माहितीये त्यानुसार हे वेदनादायक टेस्ट असते. त्यानं मला सांगितलं नाही, त्यानं टेस्ट केली आणि तो परत आहे. त्यानं लोकांसाठी खूप काही केलंय,” असं तो म्हणाला.

Web Title: bollywood actor bhaijan Salman Khan did a bone marrow test for a boy Suniel Shetty told the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.