Govinda Rejects Biwi No- 1 : एकेकाळी बॉलिवूडवर अधिराज्य करणारा गोविंदा सर्वांचाच लाडका अभिनेता आहे. ९० च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हा नायक त्यावेळी प्रचंड प्रसिद्ध होता. सिनेसृष्टीतील प्रत्येक दिग्दर्शक त्याला आपल्या सिनेमाचा भाग बनवण्यासाठी उत्सुक असायचा. पण हळुहळू त्याचा अभिनय क्षेत्रातील दबदबा कमी होऊ लागला आणि तो इंडस्ट्रीपासून लांब गेला. त्याच्या करियरला उतरती कळा लागली आणि तो इंडस्ट्रीतून गायब झाला. यामागे नेमकं काय कारण होतं, ते आपण जाणून घेणार आहोत.
बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांच्या यादीत आजही गोविंदाचं नाव अग्रस्थानी येतं. पण अचानक गोविंदाचे चित्रपट फ्लॉप होऊ लागले आणि त्याचा स्टारडम कमी होत गेला. याचं कारण 'बिवी नं-१' सिनेमा असल्याचं सांगण्यात येतं. १९९९ मध्ये 'बिवी नं- १' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला. डेविड धवनाचा 'बिवी नं-१' त्या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. रिपोर्टनुसार, या चित्रपटासाठी सलमान खान अगोदर अभिनेता गोविंदाला विचारणा करण्यात आली होती. पण त्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला.
माहितीनूसार, या चित्रपटाचं कथानक गोविंदाच्या कॅरेक्टरला साजेसं होतं. खरं तर ही स्क्रिप्ट गोविंदासाठीच लिहीली गेली होती. तो काळ असा होता की तेव्हा गोविंदा आणि करिश्मा कपूरची जोडीला प्रेक्षकांनी चांगलच डोक्यावर घेतलं होतं. त्या दोघांचे चित्रपट त्यावेळेस सुपरहिट व्हायचे. 'आंटी नंबर-१' , 'बिवी नंबर-१', 'हिरो नंबर- १' तसेच 'जोडी नंबर-१' , 'अनाडी नंबर-१' यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी एकत्र काम केलं आहे. पण 'बिवी नं- १' या चित्रपटात काम करण्यास गोविंदाने नकार दिल्याने सलमानला कास्ट करण्यात आलं.
या चित्रपटात करिश्मा कपूर, सुश्मिता सेन या अभिनेत्री गोविंदासोबत मुख्य भूमिकेत काम करणार होत्या. अशातच अभिनेत्याने सुश्मिता सोबत काम करणार नसल्याचं स्पष्ट सांगितलं. ही माहिती डेविड धवन यांच्यापर्यंत पोहचेपर्यंत बराच उशीर झाला होता. सिनेमाचं अर्ध कास्टिंग पूर्ण झालं होतं. त्यामुळे त्यांनी सुश्मिताला सिनेमातून काढणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे गोविंदाने या सिनेमासाठी घेतलेली सायनिंग अमाउंट परत केली आणि या चित्रपटात सलमान खानची वर्णी लागली.
हे होतं खरं कारण-
या आधी गोविंदाने 'बिवी नंबर -१' मध्ये काम न करण्याचं कारणही सांगितलं. हा सिनेमा ऑफर होण्यापूर्वी गोविंदाने अशाच प्रकारचे कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं, ज्यामध्ये नायक त्याचे विवाह बाह्य संबंध ठेवतो आणि त्याच्या पत्नीला धोका देतो. अशा भूमिका करण्यास रुची नसल्यामुळे गोविंदाने या चित्रपटात काम केलं नाही, असं सांगितलं जातं.