Join us

जग्गू दादाचा वर्षा उसगांवकरांना पाठिंबा, कौतुकही केलं, म्हणाले "तू भारीच आहेस, Good Luck"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 3:09 PM

सध्या 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची चांगलीच चर्चा आहे.

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वात पहिल्या दिवसापासूनच राडे होताना दिसत आहेत. सध्या 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची चांगलीच चर्चा आहे. 'वंडर गर्ल' वर्षा उसगांवकर सर्व स्पर्धकांच्या खांद्याला खांदा लावून चांगला खेळ दाखवत आहेत. या आठवड्यात त्या चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्याला कारणही तेवढंच खास आहे.  बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी वर्षा यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

वर्षा उसगांवकर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये जॅकी श्रॉफ म्हणतात, "एक नंबर...भारी...वर्षा. जास्त काही बोलणार नाही. बिग बॉसच्या घरात किंवा खऱ्या आयुष्यात तू भारीच आहेस.  चल भेटू. Good Luck", अशा शब्दात त्यांनी वर्षा उसगावंकर यांना शुभेच्छा दिल्या. जॅकी श्रॉफ यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांनीदेखील भरभरुन कमेंट केल्या आहेत. 

 

वर्षा उसगांवकर  या ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. त्यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीही गाजवली होती. वर्षा यांनी रजनीकांत, नाना पाटेकर, जितेंद्र, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती अशा मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलं आहे.  १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला दूध का कर्ज हा त्यांचा पहिला बॉलिवूड सिनेमा होता. यानंतर हनीमून, शिकारी, साथी, इंसानियत के देवता, मुकदमा, तिरंगा आणि चेहरा या सिनेमातही त्या झळकल्या होत्या.  अभिनय, सौंदर्य आणि दिलखेचक अदांनी त्यांनी आतापर्यंतच्या कारकिर्दीत विविध भूमिका गाजवल्या आहेत.  सध्या त्या बिग बॉसचं घरही गाजवत आहेत. 

बिग बॉसचा हा आठवडा खूपच उत्साहवर्धक आणि मनोरंजक आहे.  नवीन सीझन सुरु होऊन ५० दिवसांपेक्षा जास्त काळ उलटला आहे. दरम्यान, या आठवड्यात अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि वर्षा उसगांवकर हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता आठव्या आठवड्यात कोण घराबाहेर होतंय? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. 

टॅग्स :जॅकी श्रॉफवर्षा उसगांवकरबिग बॉस मराठीसेलिब्रिटी