Milind Gunaji : रुपेरी पडद्यावर हळूवारपणे प्रेमकथा उलगडणारा चित्रपट म्हणजे 'दिलवाले दुल्हनिया लें जायेंगे'. २० ऑक्टोबर १९९५ मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला होता. आज जवळपास २९ वर्ष उलटूनही चाहत्यांमध्ये या चित्रपटाची क्रेझ कायम आहे. अभिनेता शाहरूख खान आणि काजोल यांच्या केमिस्ट्रीने रंगलेल्या या चित्रपटानं आजही प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम ठेवलं आहे. '
अभिनेते अमरीश पूरी, शाहरुख खान, काजोल तसेच अनुपम खेर, फरीदा जलाल आणि परमीत सेठी यांसारखी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. कमाईचे अनेक विक्रम मोडून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या सिनेमात अभिनेते परमीत सेठीसोबत काजोलचं लग्न ठरतं आणि सिनेमात नवं वळण येतं. पण या चित्रपटाबाबत तुम्हाला एक खास गोष्ट माहित आहे का?
परमीत सेठी यांना कुलजीतची भूमिका सुरूवातीला मराठमोळे अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी ऑफर करण्यात आली होती. पण वाढलेल्या दाढीमुळे त्यांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.
एका मुलाखती दरम्यान मिलींद गुणाजी यांनी याबाबत खुलासा केला, 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटासाठी परमीत सेठींच्या आधी अभिनेते मिलींद गुणाजी यांना या चित्रपटासाठी विचारणा करण्यात आली होती. '' या सिनेमात मला कुलजीतच्या भूमिकेसाठी दाढी कापण्यास सांगितलं गेलं. त्याचदरम्यान, मी २ ते ३ चित्रपट साईन केले होते. त्यामध्ये मी करत असलेल्या पात्रासाठी दाढी गरजेची होती. त्यावेळी एका मोठ्या दिग्दर्शकाला मी नकार दिला याची मला आजही खंत आहे.'' असं देखील ते म्हणाले.