बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया नेहमी चर्चेत असते. सध्या ती एका ट्विटमुळे वादात सापडली आहे, नेहा धुपीयाने एक ट्विट करत स्विगीकडे तक्रार केली आहे. नेहाने ट्विटरवर काही फोटो शेअर केले आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आणि फास्ट फूड चेन मॅकडोनाल्ड्सकडे तक्रार केली. या फोटोमध्ये स्विगीकडून ऑर्डर केलेली पॅकेट्स दिसत आहेत. पण त्यातही फूड डिलिव्हरी एजंट असल्याचे फोटो आहेत. या एका फोटोवर नेटकऱ्यांनी नेहाला घेरले आहे.
नेहा धुपियाने २० जानेवारीला ट्विट केले होते. हे ट्विट स्विगीच्या ऑर्डरबाबत होते. मॅकडोनाल्ड वरून मागवलेले कॉफीचे पॅकेट उघडले. या पॅकेटमधील कॉफी खराब झाली होती, असं यात लिहिले आहे.
"प्रिय स्विगी आणि मॅकडोनाल्ड्स, पॅकिंग किंवा डिलिव्हरीमध्ये तुमचा निष्काळजीपणा हे एक न सुटलेले गूढ आहे... पण यामुळे माझ्या स्टाफचे जेवण खराब झाले. कृपया थोडेसे बेफिकीर राहा...ही ऑर्डर दीपकने डिलिव्हर केली.... या छान व्यक्तीने माझ्या लक्षात आणून दिले. ... कॉफी घेतल्यानंतर मी बरी आहे. मला काय सापडले नाही याचा अंदाज लावा!!!", असं या ट्विटमध्ये म्हटले आहे.
चोराची अशीही नाटकं! रंगेहात पकडल्यानंतर गच्चीवरुन उडी मारण्याची दिली धमकी
या ट्विटमध्ये नेहाने डिलिव्हरी बॉयचा फोटोही शेअर केला आहे. डिलिव्हरी एजंटचा फोटो पाहून अनेकांनी नेहावर राग व्यक्त केला आहे. या प्रकरणावरुन नेहाला ट्रोल करण्यात आले आहे.अनेकांनी कमेंट करुन टीका केली आहे. डिलिव्हरी बॉयचा फोटो पोस्ट करू नये असे अनेकांनी यात लिहिले आहे.