Neil Nitin Mukesh: हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू म्हणजेच अभिनेता नील नितीन मुकेश (Neil NItin Mukesh) एक उत्तम कलाकार आहे. बॉलिवूडचा (Bolywood) हॅंडसम हंक म्हणून अभिनेत्याकडे पाहिलं जातं. नीलने त्याच्या अभिनय कारकिर्दीत काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. उत्तम अभिनय आणि टॅलेंटच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. अलिकडेच नील २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'साहो' या चित्रपटामध्ये झळकला होता. त्यानंतर आता ६ वर्षानंतर अभिनेता पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करतो आहे. 'हिसाब बराबर' च्या माध्यमातून अभिनेता प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
'हिसाब बराबर' या चित्रपटामध्ये नील आणि आर. माधवन एकत्रित काम करताना दिसणार आहेत. येत्या २४ जानेवारीच्या दिवशी या चित्रपटाचा ओटीटी प्रिमियर झी-५ वर प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अलिकडेच 'हिसाब बराबर' चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू या तीन भाषांमध्ये रिलीज होणार आहे. अश्वीनी धीर यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शिवाय नील यामध्ये एका स्कॅमरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.
वर्कफ्रंट
नील नितीन मुकेश याने २००७ मध्ये आलेल्या श्रीराम राघवन यांच्या 'जॉनी गद्दार' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर अभिनेत्याने 'न्यूयॉर्क', 'प्रेम रतन धन पायो', 'गोलमाल अगेन' आणि 'साहो' या चित्रपटांमध्येही तो झळकला. बॉलवूडबरोबर त्याने साउथ इंडस्ट्रीतही आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकली.