एकवेळचं जेवणही नव्हतं; पाणी पिऊन काढले दिवस; आज कोट्यवधींचा मालक आहे हा अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 05:39 PM2024-09-27T17:39:44+5:302024-09-27T17:46:54+5:30

Rajkumar Rao : बॉलिवूडसारख्या झगमगत्या दुनियेत एखाद्याचा निभाव लागणं फार मोठी गोष्ट आहे. हिंदी सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार सापडतील ज्यांनी स्वबळावर अभिनय क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. जाणून घेऊया अशाच एका अभिनेत्याबद्दल...

अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही या अभिनेत्याने कलाविश्वात स्वत: चं अढळ स्थान निर्माण केलं आहे. हा अभिनेता म्हणजे राजकुमार राव.

'स्री- २' च्या यशानंतर सध्या अभिनेता राजकुमार राव 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या चित्रपटामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत अभिनेत्याने प्रेक्षकांना त्याची दखल घ्यायला भाग पाडलं. परंतु त्याचा इथपर्यंतचा प्रवास फार काही सोपा नव्हता.

रणवीर अलाहाबादिला दिलेल्या एका मुलाखतीत राजकुमार रावने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं.

या मुलाखतीत अभिनेता म्हणाला, "कधी-कधी तर माझ्याकडे पैसेच नसायचे. त्यावेळी उपाशीपोटी पाणी पिऊन दिवस काढावे लागत होते. हाती काम नसल्यामुळे मला खर्चासाठी घरचे पैसे द्यायचे. त्यासोबत एक वेळ अशी जेव्हा एकाच वेळी १०-१० ठिकाणी ऑडिशन्स द्यावे लागत होते".

पुढे राजकुमार रावने सांगितलं, की "तेव्हा माझ्या अकाउंटमध्ये फक्त १८ रुपये होते".

सध्याच्या घडीला या अभिनेत्याची गणना बॉलिवूडमधील आघाडीच्या नायकांमध्ये केली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, राजकुमार राव ८१ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.